राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी आज (रविवारी) सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील ४७ हजार २२३ मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे.
राज्यात चार कोटी मतदार असून २,०८७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. चार कोटींपैकी १.९२ कोटी महिला मतदार आहेत, अशी माहिती राजस्थानचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सल्लागारांनी दिली. या निवडणुकीत १८ ते १९ वयोगटातील १७ लाख नवे मतदार नोंदवले आहेत.
काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी २००, बसपाचे १९५, माकपचे ३८, सीपीआयचे २३, राष्ट्रवादीचे १६, अन्य पक्षांचे ६६६ आणि ७५८ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. कॉँग्रेसने ३१ नवे चेहरे दिले असून १९ मंत्री व २९ विद्यमान आमदार पुन्हा आपले भवितव्य आजमावत आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष वसुंधरा राजे या झालरापाटण येथून निवडणूक लढवित आहेत.
या निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक लाख १९ हजार२७२ पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३८ हजार ७१५ जवान तैनात केले आहेत.

Story img Loader