आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज बुधवार राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रा यांची चौकशी केली. दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणी राजस्थान संघाचे खेळाडू एस.श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तीघांना अटक केलेली आहे. त्यामुळे संघ मालक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची, तसेच संघाचा कर्णधार राहुल द्रवीडची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे याआधीच वर्तवण्यात आले होते. त्यानुसार आज दिल्ली पोलिसांनी राज कुंद्रा यांची चौकशी केली.
राजस्थान रॉयल्स संघाच्या अटक करण्यात आलेल्या तिन्ही खेळाडूंवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला. तसेच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांचाही या बेकायदा आयपीएल फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी वर्तवली आहे.

Story img Loader