राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. येथील सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या माजी आयुक्तांवर २० महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत या आरोपींनी महिलांवर अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके प्रकरण काय?

दोन आरोपींनी साधारण २० महिलांना अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाली जिल्ह्यात ही घटना घडली असून यातील एका कथित पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.

व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप

आरोपींनी अत्याचार करताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. हे व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींकडून पाच लाख रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत म्हणण्यात आले आहे. माझ्यासह अन्य २० महिलांसोबत असा प्रकार घडल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.

जेवणात गुंगीचे औषध देऊन अत्याचार

दाखल तक्रारीनुसार तक्रारदार महिलेसह अन्य महिला काही महिन्यांपूर्वी अंगणवाडीत काम करण्यासाठी सिरोही येथे गेल्या होत्या. या ठिकाणी तक्रारदार महिलेची आरोपींशी ओळख झाली. या आरोपींनी महिलेच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली. मला देण्यात आलेल्या जेवणात गुंगीचे औषध टाकण्यात येत होते. शुद्ध हरपल्यानंतर माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला, असे या महिलेले आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

महिलेकडून खोटी तक्रार?

दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिकारी पारस चौधरी यांनी अधिक माहिती दिली. चौधरी यांच्या म्हणण्यानुसार कथित पीडित महिलेने पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र आठ महिलांनी याचिका दाखल केल्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan sirohi municipal council 20 women gang raped pretext of job prd