कोटा शहरात भाडय़ाने राहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीवर राजस्थान पोलीस दलाच्या दोन बडतर्फ जवानांनी बलात्कार केल्यानी खळबळजनक घटना येथे घटली आह़े मोहन सिंग आणि जय कुमार अशी या नराधम आरोपींची नावे आहेत़  ७ मार्च रोजी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून प्रवास करीत असताना येथील रावतभट मार्गावर ही घटना घडली़
दुचाकीवरच असलेल्या आरोपींनी या दोघांना थांबवून दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली़  त्यानंतर हे जोडपे संशयास्पदरित्या भटकत असल्याचा कांगावा करीत दोघांनाही पोलीस चौकीवर येण्यास सांगितल़े  जोडप्याला जय कुमार याच्या दुचाकीवर बळजबरीने बसविण्यात आले आणि जोडप्याची दुचाकी मोहन सिंग याने घेतली़  एका निर्मनुष्य जागी नेऊन प्रथम त्यांनी मुलाला जबर मारहाण केली आणि मुलीवर बलात्कार केला, अशी माहिती कोटा येथील दाबाबादी पोलीस ठाण्यातील अधिकारी धर्मेद्र कुमार यांनी दिली़
या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी मोहन सिंग याला शनिवारी अटकही करण्यात आली आह़े  त्याला १६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आह़े  अन्य आरोपी जय कुमार अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आह़े
या दोन्ही आरोपींना २००६ साली दरोडा घातल्याच्या प्रकरणी पोलीस सेवातून कमी करण्यात आले होते, असेही अधिकाऱ्याने सांगितल़े

Story img Loader