राजस्थानच्या बिकानेरमधील एक डॉक्टर आजार बरा होण्यासाठी इस्लामचा स्वीकार करण्याचा सल्ला देत असल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टर जमीमा हयात विरुद्ध अनेक रुग्णांनी तक्रार केल्यानंतर सीएमएचओ डॉ. देवेंद्र चौधरी यांनी जमीमा हयातला असे न करण्यास सुनावले. परंतु, या महिला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष करत आपली प्रॅक्टिस सुरुच ठेवली. अलिकडेच त्यांना एक नोटीस जारी करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयातूनदेखील या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त असून, आरोप सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहेत. पंतप्रधानांना संकेतस्थळावरून याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आपल्या आठ वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी जमीमाकडे गेल्याचे मनीष सिंघल नावाच्या व्यक्तीने सांगितले. इस्लामचा स्वीकार केल्याने त्याच्या कुटूंबाच्या सर्व समस्या कशाप्रकारे दूर होतील ते जमीमाने त्यांना सांगितले. उपचारादरम्यान ती इस्लामिक वाक्येदेखील म्हणत होती. जमीमाच्या विरुद्ध या आधीदेखील अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या कारणाने अनेकवेळा तिची बदलीदेखील करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा