अमेरिकेतील गोल्डमन सॅक्सचे भारतीय वंशाचे माजी संचालक रजत गुप्ता यांचे अपील न्यायालयाने फेटाळले आहे. आर्थिक उलाढाल प्रकरणातील गैरप्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली असून त्यावर त्यांनी केलेले अपील फेटाळण्यात आले. कंपन्यांच्या कामगिरीबाबतची गोपनीय माहिती व्यक्तिगत फायद्याच्या बदल्यात पुरवल्याच्या आपल्यावरील आरोपाचे पुरेसे पुरावे नाहीत, असे गुप्ता यांच्या अपिलात म्हटले
होते.
जिल्हा न्यायाधीश जेड रॅकॉफ यांनी नऊ पानांच्या निकालपत्रात म्हटले आहे की, व्यक्तिगत फायद्यविषयी देण्यात आलेले पुरावे पुरेसे नाहीत हा युक्तिवाद अयोग्य आहे. हा युक्तिवाद उशिरा करण्यात आला असून त्यात फार तथ्य नाही.
गुप्ता यांना २०१२ मध्ये कंपन्यांच्या संचालक मंडळातील बैठकांचे निर्णय दुसऱ्या प्रतिस्पध्र्याना देण्याच्या आरोपावरून दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात राजस्थान संचित निधीचे संस्थापक राज राजरत्नम यांनाही तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. गुप्ता यांनी अनेक मुद्दय़ांवर अपील केले होते पण संघराज्य न्यायालयांनी व सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे युक्तिवाद फेटाळून त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. नव्या अपिलात गुप्ता यांनी असे म्हटले होते की, अपील न्यायालयाने अलीकडे दिलेल्या निकालात टॉड न्यूमन व अँथनी चियासन यांना आरोपातून निर्दोष सोडण्यात आले त्यामुळे आपल्यालाही सोडावे. बँकेची कामगिरी व वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीची कामगिरी व संबंधित माहिती इतरांना कळवून त्याबदल्यात व्यक्तिगत फायदे मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. रॅकॉफ यांनी सांगितले की, गुप्ता यांनी हा युक्तिवाद अपिलात केला नाही व आता ते न्यूमन यांच्याबाबतच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा