‘इन्सायडर ट्रेडिंग’ प्रकरणामध्ये अमेरिकी न्यायालयाने सुनावलेला एक कोटी ३९ लाख अमेरिकी डॉलरचा दंड आणि कोणत्याही सार्वजनिक कंपनीच्या संचालक पदावर बसण्यास आजीवन बंदीची शिक्षा रद्द करण्यात यावी, यासाठी ‘गोल्डमन सॅक’चे संचालक रजत गुप्ता यांनी याचिका दाखल केली आह़े  जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी येथील वरिष्ठ न्यायालयात रजत यांच्या वकिलाने सोमवारी ही याचिका दाखल केली़  न्यायालयाने हा दंड लादताना तारतम्य न बाळगल्याचा याचिकादारांचा आरोप आह़े  गुप्ता यांनी दिलेल्या माहितीमुळे फंड व्यवस्थापक राज राजरत्नम यांना झालेल्या लाभापेक्षाही हा दंड तिप्पट अधिक आहे, असे वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आह़े  अन्य एका प्रकरणामध्ये गुप्ता यांना ५ दशलक्ष डॉलरचा दंड आणि २ वर्षांची शिक्षा झालेली असताना ६४ वर्षीय गुप्ता यांच्यावर लादण्यात आलेला दंड अधिकच आहे, असा दावा वकिलांतर्फे करण्यात आला.

Story img Loader