एकेकाळी भारताचे अमेरिकेतील चेहरा असलेले रजत गुप्ता आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगण्यासाठी गेले आहेत. गोल्डमन सॅशे कंपनीचे ते माजी संचालक आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील एका आर्थिक गैरव्यवहारात त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले व ती कायदेशीर लढाई अखेर ते हरले होते.
अमेरिकेतील भारतीयांमध्ये सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ते वॉल स्ट्रीटमध्ये नाव कमावून होते. त्यांना बुधवारी मॅसॅच्युसेटस येथे फेडरल मेडिकल सेंटर डेव्हन्सच्या सुरक्षा छावणीत तुरूंगवासासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या खोलीत १३२ कैदी आहेत, त्यात त्यांचे एक मित्र व हेज फंड संस्थापक राज राजरत्नम अकरा वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहेत. गुप्ता यांना २०१२ रोजी न्यायालयाने दोषी ठरवले होते व दोन वर्षांचा तुरूंगवास ५० लाख डॉलर दंड, गोल्डमन सॅशेला वेगळे ६० लाख डॉलर इतकी रक्कम देण्याचा आदेश देण्यात आला होता. गुप्ता हे आयआयटी दिल्ली व हार्वर्डचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना तुरूंगात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यांना आपले मित्र व कुटुंबीयांना शनिवार व रविवारी सकाळी साडेआठ ते दुपारी तीन यावेळेत भेटता येईल. शुक्रवारी दुपारी २.३० ते ८.३० दरम्यान भेटता येईल. एकावेळी मुलांसह पाच जणांनाच भेटता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा