Rajat Kumar Who Saved Rishabh Pant Fighting Life Battle: भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ भयंकर अपघात झाला होता. त्यावेळी पंत जखमी अवस्थेत पडला असताना रजत आणि निशू नावाच्या दोन तरुणांनी त्याला जळत्या गाडीतून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान त्यावेळी ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत आता रुग्णालयात आपल्या आयुष्याची झुंज देत आहे. रजतने मंगळवारी त्याच्या प्रेसयीसीबरोबर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर, प्रेयसीचा मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेयसीबरोबर आत्महत्येचा प्रयत्न

रजत कुमार हा उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुच्चा बस्ती गावचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. दरम्यान, त्याची प्रेयसी वेगळ्या समाजाची होती. त्यामुळे दोघांच्या विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता. दरम्यान, रजतच्या मैत्रिणीचे लग्न दुसऱ्या एकाशी लग्न ठरले होते. त्यामुळे तिचे कुटुंब तिला रजतला भेटण्यापासून रोखत होते. तसेच, रजतच्या कुटुंबीयांनाही त्याचे लग्न दुसऱ्या मुलीशी लावायचे होते. त्यामुळे दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रजत आणि त्याच्या मैत्रिणीने विष प्राशन केले. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आणि रजतची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तो रुग्णालयात आयुष्यासाठी झुंजत आहे. मुलीच्या आईने रजतवर तिच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

२०२२ मध्ये वाचवला होता पंतचा जीव

३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभ पंतचा गंभीर अपघात झाला होता. त्यावेळी रजत कुमार याने पंतला रुग्णालयाच दाखल केले होते. त्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. ऋषभ पंत दिल्लीहून उत्तराखंडमधील त्याच्या घरी रुरकीला जात होता. वाटेत, त्यांची मर्सिडीज कार डेहराडून महामार्गावर एका दुभाजकाला धडकली आणि आग लागली होती.

यानंतर महामार्गाच्या कडेला असलेल्या एका कारखान्यात काम करणाऱ्या रजत कुमार आणि त्याच्या मित्राने गाडी जळताना पाहिली होती. त्यांनी यावेळी कार चालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, नंतर त्यांना कळले की, चालक भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे. दोघांनीही पंतला जळत्या गाडीतून बाहेर काढले आणि प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर दोघांचेही देशभरातून कौतुक झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajat kumar rishabh pant life saving car accident survival battle bravery rescue aam