ललित मोदी यांना मदत केल्याच्या मुद्द्यावरून राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही कॉंग्रेसने लक्ष्य केले असून, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत वसुंधरा राजे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. कॉंग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी पत्रकार परिषदेत या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
त्या म्हणाल्या, आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेल्या व्यक्तीला यांनी मदत केली आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिलेच पाहिजेत. या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चुप्पी साधली आहे. यातून हेच दिसून येते की मोदींचा देखील या दोन्ही मंत्र्यांच्या कृत्यांना छुपा पाठिंबाच आहे.
या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजेंच्या कृत्यांना मोदींचा छुपा पाठिंबा – कॉंग्रेसची टीका
कॉंग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी पत्रकार परिषदेत या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

First published on: 17-06-2015 at 01:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raje should quit along with swaraj cong