श्रीलंकेतील तामिळ नागरिकांवर झालेल्या अत्याचाराची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चौकशी करावी आणि तेथील तामिळ नागरिकांचे पुनर्वसन करावे, यासाठी तामिळ चित्रपट कलाकारांच्या एक दिवसीय उपोषणामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता रजनीकांतही मंगळवारी सहभागी झाला. 
कलाकारांसह, तंत्रज्ञ, निर्माते, वितरक, दिग्दर्शक असे सर्वच जण उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. उपोषणामुळे तामिळ चित्रपटसृष्टीतील काम मंगळवारी पूर्णपणे थंडावले. साऊथ इंडियन फिल्म आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आर. सरथकुमार, अजिथकुमार आणि सूर्या हेदेखील उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.
उपोषणाला बसलेले कलाकार मंगळवारी संध्याकाळी श्रीलंकेतील तामिळ नागरिकांवर होणाऱया अत्याचाराविरोधात आपल्या मागण्यांसाठी ठराव करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth starts hunger strike over atrocities against sri lankan tamils