गुजरातमधील राजकोट शहरात एका गेमिंग झोनमध्ये शनिवारी (२५ मे) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत तब्बल २८ लोकांचा मृत्यू झला. या आगीत अनेक लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेमुळे राजकोटमध्ये आगेचा मोठा आगडोंब उसळला होता. त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. ही आगीची घटना घडल्यानंतर या राजकोट गेम झोनच्या भागधारकांपैकी एक असलेले प्रकाश हिरण हे बेपत्ता होते.

गेमिंग झोनला लागलेल्या आगीची घटना घडल्यानंतर प्रकाश हिरण यांच्याशी संपर्क झाला नव्हता. आता त्यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेमिंग झोनला भीषण आग लागली त्यावेळी प्रकाश हिरण हे घटनास्थळी उपस्थित होते. आगीची घटना घडली तेव्हा ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं होतं. मात्र, ही घटना घडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे कदाचित ते पळून गेल्याचा संशय पोलिसांना होता.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
india sets conditions for elon musk s starlink satellite licence approval
एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतीय अवकाश खुले; मात्र परवाना नियम-शर्तींच्या पूर्ततेनंतरच केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन
shaktimaan arriving soon mukesh khanna
भारताचा पहिला सुपरहीरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या

हेही वाचा : Rajkot Fire: “अशा घटना घडतच असतात”, २८ जणांचे जीव घेणाऱ्या गेमिंग झोनच्या मालकाचे न्यायालयात विधान

आता त्यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेमिंग झोनमध्ये मृत्यू झालेल्या एका मृतदेहांची ओळख पटत नव्हती. त्यानंतर त्या मृतदेहांचे डीएनए चाचणीसाठी सँपल पाठवण्यात आले होते. यानंतर हा डीएनए प्रकाश हिरण यांच्या आईशी मॅच झाला. डीएनए चाचणीद्वारे प्रकाश हिरणच्या ओळखीची पुष्टी करत या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे. दरम्यान, प्रकाश हिरण यांच्याकडे या गेमिंग झोनची जवळपास ६० टक्के भागीदारी होती, अशी माहिती सांगितली जात आहे.

दोन भागीदारांना पोलिसांकडून अटक

राजकोटमध्ये टीआरपी गेमिंग झोनमध्ये झालेल्या दुर्घटनेत २८ लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी युवराज हरी सिंह सोलंकी आणि राहुल राठोड या दोन भागीदारांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच नुकतेच हा गेमिंग झोन चालविणारा कर्मचारी नितीन जैनलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिघांनाही सोमवारी (दि.२७ मे) १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता या प्रकरणाचा मुख्य आरोपी धवल ठक्करला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात न्यायालयात आरोपींच्या विरोधात युक्तीवाद करणारे सरकारी वकील तुषार गोकानी यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. युवराज सोलंकी या आरोपीने न्यायालयात जात असताना घडलेल्या प्रसंगाचा पश्चाताप असल्याचे नाटक केले. तो रडवेला चेहरा करून न्यायालयात आला. मात्र न्यायालयात आल्यानंतर काही मिनिटांतच निर्लज्जपणे हसून उत्तरे देत होता, असे गोकानी यांनी सांगितले.