‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ या संस्थेच्या शैक्षणिक मंडळाचे प्रमुखपद स्वीकारण्याचा प्रस्ताव आपल्याला देण्यात आला होता पण आपण तो नाकारला, असे चित्रपट निर्माते राजू हिरानी यांनी सांगितले.
चित्रपटविषयक बरीच कामे असल्याने आपण ही जबाबदारी स्वीकारत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिरानी यांनी मुन्नाभाई मालिका, थ्री इडियट व पीके या चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांनी सांगितले की, एफटीआयआयमधील पेच सोडवण्यास आपण मदत करू पण प्रमुखपद स्वीकारणार नाही. सध्या गजेंद्र चौहान यांच्या करण्यात आलेल्या नियुक्तीला विद्यार्थ्यांचा विरोध असून अनेक दिवस आंदोलन सुरू आहे.
हिरानी हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सांगितले, की आपल्याला शैक्षणिक मंडळाचे प्रमुखपद देऊ केले होते पण आधीच्या कामांमुळे आल्याला ते स्वीकारणे शक्य नाही.
बाहेरून मदत करणार
सरकारने तडजोड केली असून चौहान यांना प्रशासकीय मंडळाचे प्रमुखपद देऊन हिरानी यांना शैक्षणिक मंडळाचे प्रमुख पद दिले जाणार आहे, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यात शैक्षणिक मंडळच महत्त्वाचे निर्णय घेत असते. हिरानी यांनी सांगितले, की एफटीआयआयमधील पेच सोडवण्यासाठी आपण बाहेरून मदत करू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा