उत्तर प्रदेश सरकार प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष राजनाथ सिंह यांना मुझफ्फरनगर दौरा रद्द करावा लागला आहे.
ठरलेल्या दौऱयानुसार राजनाथसिंह आज शनिवार दंगलग्रस्त मुझफ्फरनगरला भेट देणार होते. परंतु, त्याआधीच त्यांना तेथे जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
“मला तेथे जाऊन दंगलग्रस्त भागातील कुटुंबीयांची विचारपूस करावयाची होती. तेथील नेमकी परिस्थिती जाणून घ्यायची होती. परंतु, उत्तरप्रदेश सरकारने तेथे जाण्यास परवानगी नाकारल्याने मला माझा दौरा रद्द करावा लागला” असे राजनाथ सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले.