लखनऊ मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शनिवारी ज्येष्ठ काँग्रेस नेते एनडी तिवारींची भेट घेतली. राजनाथ सिंहांनी तिवारी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. एनडी तिवारी यांनी यापूर्वी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे. राजनाथसिंह यांची भेट घेतल्यानंतर तिवारी म्हणाले, की ते तर राजा आहेत. ते आज आले आहेत, त्यामुळे समर्थन तर दिलेच पाहिजे. तर राजनाथसिंह म्हणाले, की उत्तर प्रदेशातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मी दिलेले भाषण पाहून तिवारी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, की तू राज्याचे भविष्य आहेस.तिवारी यांना यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट देण्यास नकार दिला होता. तिवारी हे उत्तराखंडमधून सहावेळा निवडून आले आहेत.
राजनाथ सिंह एनडी तिवारींच्या भेटीला
लखनऊ मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शनिवारी ज्येष्ठ काँग्रेस नेते एनडी तिवारींची भेट घेतली.
First published on: 26-04-2014 at 03:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh meets cong leader n d tiwari for his blessings