Rajnath Singh : वाढत्या आव्हानांमुळे सशस्त्र दलांनी सतर्त राहण्याची गरज आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झालेल्या पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये रशिया युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलांचे परिवर्तन’ या परिषदेत ते म्हणाले, “भारत एक शांतताप्रिय राष्ट्र आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार असणे आवश्यक आहे. संयुक्त लष्करी दृष्टीकोन विकसित करणे आणि भविष्यातील संभाव्य युद्धांमध्ये देशाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, यासाठी तयारी करणे यावर त्यांनी भर दिला.

हेही वाचा >> विश्लेषण: संरक्षण सामग्री निर्यातीत लक्षणीय वाढ? निर्यात कशी वाढतेय?

आपल्या देशातील शांतता अबाधित राखणं महत्त्वाचं

सध्या सुरू असलेल्या जागतिक संघर्षांचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले, “जागतिक अस्थिरता असूनही भारतात शांतता आहे. मात्र, सध्या वाढत असलेल्या आव्हानांमुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अमृतकाळात आपण आपली शांतता अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे मजबूत राष्ट्रीय सुरक्षा धोरण असायला हवं.”

डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी लष्करी नेतृत्वाला केले. “हे घटक कोणत्याही संघर्षात किंवा युद्धात थेट सहभागी होत नाहीत. त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग युद्धाचा मार्ग ठरवत आहे”, असं संरक्षण मंत्री पुढे म्हणाले.

: सैन्यदलांचे आधुनिकीकरण करून राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करण्यावर नवे सरकार भर देईल. देशांतर्गत संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून त्यांचा देशाला फायदा होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताना ते म्हणाले होते की, “सध्या संरक्षण निर्यात २१,०८३ कोटी असून २०२८-२९ पर्यंत त्यांत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी सरकार तत्परतेने काम करेल. सैन्यदलांना अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज केले जात असून प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी ते सज्ज आहेत.’’ संरक्षणसज्जता वाढवण्यासाठी आणि संरक्षणामध्ये ‘आत्मनिर्भरता’ आणण्यासाठी आणि प्रमुख योजना आणि उपक्रमांच्या जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी नियमित आढावा बैठका घेतल्या जातील, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.