महात्मा गांधी यांच्यानंतर भारतीय जनतेचे मन समजून घेणारे दुसरे कोणी नेते असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि सध्या राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय सिंग यांच्या ‘द आर्किटेक्ट ऑफ द न्यू बीजेपी: हाऊ नरेंद्र मोदी ट्रान्सफॉर्म्ड द पार्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.
हेही वाचा – पूर आणि महागाईमुळे पाकिस्तान आलं ताळ्यावर, भारताशी व्यापाराबाबत केली केली ‘ही’ मोठी घोषणा!
“नरेंद्र मोदी यांनी भाजपाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांनी एक असे मॉडेल तयार केले आहे, ज्याला तोड नाही. देशात आज अनेक पक्ष भाजपाला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणालाही ते शक्य नाही. स्वतंत्र भारतात दिलेला शब्द पाळणारे नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहे. २०१४ नंतर भाजपाने जे काही यश, वैभव प्राप्त केले आहे, ते केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आहे.”, अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंह यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्यानंतर भारतीय जनतेचे मन समजून घेणारे दुसरे कोणी नेते असतील, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांना भारतीयांच्या भावना आणि समस्या माहिती आहे.”
हेही वाचा – तातडीच्या दाव्यांसाठी गुरुवारपासून नवी यंत्रणा; सरन्यायाधीश उदय लळित यांचे प्रतिपादन
दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित असलेले राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनीही नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहे, असे म्हणाले.