अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीत एका इस्रायली व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या हल्ल्यामुळे जहाजावर आग लागून जहाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या जहाजाचं नाव एमव्ही केम प्लूटो असून हे जहाज सौदी अरेबियातून कच्चं तेल घेऊन मंगळुरूला येत होतं. परंतु, हल्ल्यामुळे जहाजाचा मार्ग बदलण्यात आला. सोमवारी हे जहाज मुंबईच्या बंदरात थांबवण्यात आलं. दरम्यान, या हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, भारत सरकार या हल्ल्याकडे खूप गांभीर्याने पाहत आहे. हा हल्ला करणारे समुद्राच्या तळाशी लपून बसले तरी त्यांना आम्ही शोधून काढू. विशाखापट्टनम वर्गातील (Visakhapatnam Class Destroyer) तिसरी युद्धनौका आयएनएस इम्फाळ (INS Imphal) आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या नौदलाच्या शानदार कार्यक्रमाद्वारे ही युद्धनौका सेवेत दाखल झाली आहे.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
nagpur bomb threat on email of Hotel Dwarkamai near Ganeshpeth station
“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, लवकरच स्फोट होणार,” ईमेलवरील धमकीने उपराजधानीत खळबळ…

दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, “हल्ली समुद्रात हालचाल वाढली आहे. आपल्या नौदलाच्या वाढलेल्या ताकदीमुळे काहींचा जळफळाट होत आहे. गेल्या काही दिवसांत भारताच्या मालवाहू जहाजांवर झालेले हल्ले हे गंभीरपणे घेण्यात आले आहेत. समुद्रात नौदलाची गस्त आणखी वाढवण्यात आली आहे. या घटनांमागे जे कोणी असतील ते समुद्राच्या तळाशी जरी असले तरी त्यांना आम्ही शोधून काढू. देशाच्या जवळून होणारी जलवाहतूक आणि व्पापार हा मित्र देशांच्या मदतीने आम्ही आणखी सुरक्षित करु”.

दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात ‘एमव्ही केम प्लूटो’ या जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता आणि ते इस्रायलशी संलग्न होते, गुजरातमधील वेरावळच्या नैऋत्येला २०० किलोमीटर आणि पोरबंदर किनाऱ्यापासून २१७ सागरी मैल अंतरावर समुद्रात या जहाजावर हवाई हल्ला झाला. हा हल्ला इराणने केला असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. “२०२१ पासून व्यावसायिक शिपिंगवरील हा सातवा इराणी हल्ला आहे”, असंही अमेरिकेच्या संरक्षण दलाने म्हटलं आहे.

हे ही वाचा >> जगदंबेचा उल्लेख करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले “भारतीय नौदलाच्या वाढत्या ताकदीमुळे…

एका दिवसात दोन हल्ले

या हल्ल्यापाठोपाठ लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अमेरिकन लष्कराने म्हटलं की, येमेनमधील हुती बंडखोरांनी या जहाजावर हल्ला केला होता. गॅबनच्या मालकीच्या या एमव्ही साईबाबा जहाजावर कोणतीही जीवितहानी झाली नाही. या जहाजावर २५ भारतीय कामगार होते जे सुरक्षित असल्याचं भारतीय नौदलाने सांगितलं आहे.

Story img Loader