कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याबाबत येत्या सोमवार अथवा मंगळवारी आपण संसदेत निवेदन करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहिती नाही, असे लेखी उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लोकसभेत दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
सरकारला दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहिती नाही, तो माहिती झाल्यावर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात म्हटले होते. त्यानंतर वाद झाला होता. विरोधकांनी सरकारवर भूमिका बदलल्याची टीका केली होती. त्यामुळे सरकारची कोंडी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा