पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मुलगा पंकज सिंग याने लाच घेतल्याने त्याला पंतप्रधानांनी फटकारले तसेच पंकज सिंग याच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आपल्यालाही फटकारण्यात आले, या वृत्ताचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इन्कार केला आहे. आपण व आपल्या कुटुंबीयांवरील कुठलाही आरोप सिद्ध झाला, तर सार्वजनिक जीवन व राजकारण दोन्ही सोडून देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रसारमाध्यमात अलीकडे येत असलेली माहिती ही खोटी असून त्यात काही तथ्य नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. वृत्त- लोकसत्ता

Story img Loader