Rajya Sabha Budget Session : एनडीए सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा सत्र सुरु आहे. एनडीए सरकारचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर सत्ताधारी विरोधकांच्या टिकेला उत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना उपसभापती हरिवंश यांनी जया अमिताभ बच्चन असं पूर्ण नाव घेतल्यामुळे समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या संतापल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

राज्यसभेत बोलण्यासाठी खासदार जया बच्चन यांचा नंबर आल्यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी जया अमिताभ बच्चन असं नाव पुकारलं आणि बोलण्याची परवानगी दिली. मात्र, यावर लगेचच खासदार जया बच्चन यांनी आक्षेप घेतला. तसेच उपसभापती हरिवंश यांना म्हणाल्या की, तुम्ही फक्त जया बच्चन असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. त्यानंतर उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं की, येथे पूर्ण नाव लिहलेलं असल्यामुळे मी पूर्ण नावाचा उल्लेख केला.

हेही वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधींचं दमदार भाषण अन् निर्मला सीतारामण यांनी चेहरा लपवला; लोकसभेत काय घडलं?

यानंतर पुन्हा जया बच्चन यांनी म्हटलं की, “सर फक्त जया बच्चन असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. पू्र्ण नाव घेण्याची आवश्यकता नव्हती.” मात्र, यानंतर उपसभापती हरिवंश यांनी पुन्हा जया बच्चन यांना सांगितलं की येथे रेकॉर्डमध्ये तुमचं पूर्ण नाव जया अमिताभ बच्चन असं आहे. यानंतर पुन्हा जया बच्चन या उपसभापतींना म्हणाल्या, “महिला या आपल्या नवऱ्याच्या नावाने ओळखल्या जातात. पण त्यांचं काहीच अस्तित्व नाही का? त्यांना स्वतःचं कोणतंही कर्तृत्व नाही का? की महिलांना फक्त त्यांच्या पतीच्या नावानेच ओळखलं जाईल”, असा सवाल जया बच्चन यांनी केला.

दरम्यान, यानंतर जया बच्चन यांनी दिल्लीतील राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरमध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य करत भाषण केलं. राज्यसभा खासदार जया बच्चन या अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आताही एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आपलं मत व्यक्त करत असताना उपसभापती हरिवंश यांनी पूर्ण नाव पुकारल्यामुळे जया बच्चन यांचा राग आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा जया बच्चन चर्चेत आल्या आहेत. जया बच्चन या नेहमी महिलांच्या हक्कांच्या प्रश्नांसंदर्भात संसदेत आवाज उठवत असतात. दरम्यान, जया बच्चन या समाजवादी पक्षाकडून पाचव्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत.