राज्यसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून एकूण ५९ जागांसाठी आज मतदान झाले होते. उत्तर प्रदेशातही मतमोजणीला सुरुवात झाली आहे. क्रॉस मतदान करणाऱ्या दोघा आमदारांविरोधात समाजवादी पार्टी आणि बसपाने तक्रार केल्याने काही काळासाठी मतमोजणीची प्रक्रिया थांबवली होती. राज्यसभेत आपण बहुमत मिळवू असा भाजपाला विश्वास असून उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील दोन जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. राज्यसभेच्या ५९ जागांपैकी ३३ उमेदवारांची आधीच बनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित २६ जागांसाठी चुरस आहे.

उत्तर प्रदेश
एकूण जागा १०
भाजपा – 8
सपा – 1
बसपा –

पश्चिम बंगाल
एकूण जागा ५
तृणमुल काँग्रेस – ४
काँग्रेस – १
डावे – ०

कर्नाटक
एकूण जागा ४
काँग्रेस – ३
भाजपा – १
जनता दल सेक्युलर – ०

तेलंगण
एकूण जागा – ३
टीआरएस – ३
काँग्रेस – ०
टीडीपी – ०

झारखंड
एकूण जागा – २
भाजपा –
काँग्रेस –
जेएमएम –

छत्तीसगड
एकूण जागा – १
भाजपा – १
काँग्रेस – ०
अन्य – ०

केरळ
एकूण जागा १
एलडीएफ – १
यूडीएफ – ०

 

उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेल्या भाजपाला आठ जागा जिंकण्याचा विश्वास आहे. पण नववी जागा भाजपाला मिळू नये यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. कर्नाटकात बिझनेसमन राजीव चंद्रशेखर यांच्या विजयासाठी भाजपाकडे फक्त पाच मतांची कमतरता आहे. पण भाजपाचे राज्यातील प्रमुख बी.एस.येडियुरप्पा यांनी राजीव चंद्रशेखर ५० मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या देशातील १५ राज्यांमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री असून आणि २१ राज्यांमध्ये आघाडी सरकार आहे. विधानसभेतील या ताकतीचा राज्यसभेमध्ये पुरेपूर वापर करुन घेण्याची भाजपाची रणनिती आहे. काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांची पश्चिम बंगालमधून राज्यसभेसाठी निवड झाली आहे. काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या मतदानामुळे त्यांचा विजय झाला. त्यांच्याशिवाय पश्चिम बंगालमधून तृणमुल काँग्रेसचे चार उमेदवार राज्यसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.