राज्यसभा निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून एकूण ५९ जागांसाठी आज मतदान झाले होते. उत्तर प्रदेशातही मतमोजणीला सुरुवात झाली आहे. क्रॉस मतदान करणाऱ्या दोघा आमदारांविरोधात समाजवादी पार्टी आणि बसपाने तक्रार केल्याने काही काळासाठी मतमोजणीची प्रक्रिया थांबवली होती. राज्यसभेत आपण बहुमत मिळवू असा भाजपाला विश्वास असून उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील दोन जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. राज्यसभेच्या ५९ जागांपैकी ३३ उमेदवारांची आधीच बनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित २६ जागांसाठी चुरस आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in