तुरुंगात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास अटकाव करणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून तुरुंगातील व्यक्तींचा हा हक्क अबाधित राखणारा प्रस्ताव राज्यसभेत मंगळवारी संमत झाला. राजकारण्यांची प्रतिमा गुन्हेगार म्हणून रंगविण्याबाबत न्यायालये सध्या अधिकच उत्साही झाली आहेत, अशी शेरेबाजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनीच केली!
लोकप्रतिनिधी कायद्याच्या ६२व्या कलमातील क्रमांक दोनच्या पोटकलमानुसार तुरुंगात असलेल्या व्यक्तीला मतदान करण्यास आजवर अटकाव होता. राज्यसभेने मंगळवारी लोकप्रतिनिधी कायदा दुरुस्ती विधेयकावर शिक्कामोर्तब करून तुरुंगात असलेल्यांना मतदानाचा व निवडणुकीस उभे राहण्याचा हक्क बहाल केला.
सर्वोच्च न्यायालयाने याच कलमाचा आधार घेऊन, जो मतदार म्हणून अपात्र ठरतो तो निवडणुकीलाही उभा राहू शकत नाही, असे १० जुलैच्या निकालात नमूद केले होते. त्या आदेशाविरोधात सरकारने फेरविचार याचिकाही केली असली, तरी मंगळवारी राज्यसभेत थेट कायदा दुरुस्तीचाच राजमार्ग वापरला गेला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2013 रोजी प्रकाशित
तुरुंगातूनही निवडणूक लढवू देण्याचा प्रस्ताव राज्यसभेत संमत
तुरुंगात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास अटकाव करणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून तुरुंगातील व्यक्तींचा हा हक्क अबाधित राखणारा प्रस्ताव राज्यसभेत मंगळवारी संमत झाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-08-2013 at 04:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha passes bill allowing arrested people to fight elections