माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी सोमवारी राष्ट्रीय जनता दलाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या जेठमलानी यांना गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय जनता दलाने उमेदवारी जाहीर केली होती. नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव करणाऱ्या महाआघाडीतील संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती यांनीही सोमवारी राज्यसभेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होते आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव, बिहार काँग्रेसचे प्रमुख अशोक चौधरी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा