राज्यसभा वााहिनी लवकरच व्यावसायिक स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. राष्ट्रीय संकल्पनेवर आधारित मालिका आणि टीव्ही प्रकल्पांचे प्रसारण या वाहिनीवरून करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील श्याम बेनेगल आणि टिगमांशू धुलिया आणि विनय शुक्ला या दिग्गजांना वाहिनीने यापूर्वीच सहभागी करून घेतले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित चित्रपट तसेच इतर कार्यक्रमांची निर्मिती केली जात आहे. राज्यसभा वाहिनीवर सरकारचे नियंत्रण राहणार नाही. कार्यक्रमांची विक्री करून निधी उभारण्याची परवानगीही वाहिनीला मिळाली आहे.
चित्रपटांच्या निर्मितीसह मालिका आणि माहितीपट यांचीही निर्मिती करणार आहोत. त्यांची विक्री अन्य वाहिन्यांना करण्यात येणार आहे असे राज्यसभा वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीपसिंग सप्पल यांनी सांगितले.