गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर त्यांना या महिन्यामध्ये १२ ते २० टक्क्यांदरम्यान परतावा मिळाला आहे. यामुळेच झुनझुनवाला यांना अल्पवधीमध्ये चांगला घसघशीत नफा झाला आहे. कॅनरा बँकेचे शेअर झुनझुनवाला यांनी मागील तिमाहीमध्ये क्वालिफाइड इनस्टीट्यूशन प्लेसमेंटच्या म्हणजेच क्यूआयपीच्या माध्यमातून घेतले होते. तसेच झुनझुनवाला यांनी नॅशनल अॅल्यूमिनियम कंपनी लिमिटेड म्हणजेच नॅल्कोमध्येही गुंतवणूक केली होती. झुनझुनवाला यांनी यापूर्वी अनेकदा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणूकीसंदर्भात भाष्य केलं आहे.

जूलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये झुनझुनवाला यांच्याकडे नॅल्कोचे दोन कोटी ५० लाख इक्विटी शेअर्स होते. म्हणजेच कंपनीमधील १.३६ टक्के हिस्सेदारी त्यांच्याकडे होते. कोणत्याही कंपनीला त्यांच्या कंपनीतील एका टक्क्याहून अधिक हिस्सेदारी असणाऱ्या शेअर होल्डरचं नाव आपल्या तिमाही अहवालामध्ये सांगावं लागतं. पहिल्यांदाच झुनझुनवाला यांनी अशाप्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये एवढा काळ शेअर्स होल्ड करुन ठेवले होते. झुनझुनवाला यांच्याबरोबरच लाइफ इन्शूरन्स कॉर्परेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीचाही नॅल्कोमध्ये १.१ टक्के वाटा आहे.

झुनझुनवाला यांच्याकडे असणाऱ्या तीन बँकांच्या शेअर्सपैकी एक कॅनरा बँक आहे. झुनझुनवाला यांनी कॅनरासोबतच फेड्रल बँक आणि कारुर वैश्य बँकेचेही शेअर्स घेतले आहेत. मागील महिन्यामध्ये झुनझुनवाला यांनी क्यूआयपीच्या माध्यमातून कॅनरा बँकेमध्ये २ कोटी ८८ लाख ५० हजार शेअर्स घेतले. यापैकी एका शेअरची किंमत १० लाख रुपये इतकी आहे. मागील तिमाहीमधील अहवालानुसार ३० सप्टेंबर रोजी झुनझुनवाला यांचे २ कोटी ९० लाख ९७ हजार ४०० शेअर्स म्हणजेच एकूण वाट्यापैकी १.६ टक्के वाटा कंपनीमध्ये आहे. झुनझुनवाला यांच्याप्रमाणेच एलआयसी इंडिया, बीपीएन परिबास आर्बीटरेज, मॉर्गन स्टेन्ली आशिया आणि सोसायटी जनरल यांनाही कॅनरामध्ये गुंतवणूक केलीय.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सची किंमत १२.७७ टक्क्यांनी वाढली आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचं ट्रेडिंग १९५.१० रुपये प्रती शेअर दराने सुरु आहे. झुनझुनवाला यांच्या मालकीच्या १.६ टक्के शेअर्सची सप्टेंबर अखेरीस किंम ५०३.३८ कोटी इतकी होती. या शेअर्सची किंमत वाढल्याने आता त्यांचे एकूण मूल्य ५६७.६९ कोटी इतकं झालं आहे. म्हणजेच राजेश झुनझुनवाला यांनी केवळ २० दिवसांमध्ये ६४.३० कोटी रुपये कमवले आहेत. या दोन शेअर्समधून झुनझुनवाला यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये १११ कोटी रुपये कमवले आहेत.

Story img Loader