Rakshabandhan : आज देशभर भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोड सण साजरा करत आहेत. देशभरातली बहिणी त्यांच्या भावांकडून त्यांच्या सुरक्षेचं आश्वासन घेत आहेत. परंतु, तेलंगणातल महबूबाबाद येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडलीय. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलीने शेवटची इच्छा म्हणून आपल्या भावांना राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. तिने राखी बांधलीही आणि काहीच वेळात तिचा मृत्यू झाला. तेलुगुच्या एका स्थानिक वृत्ता हवाला देत फ्रि प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हैदराबादपासून २०० किमी लांब असलेल्या महबूबाबाद जिल्ह्यात नरसिमुलापेट मंडळातील आदिसावी वस्तीत राहणारी अल्पवयीन मुलगी कोडाड येथील एका खाजगी महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. प्रेमाच्या नावाखाली एक तरुण तिचा छळ करत होता. सततचा छळ सहन न झाल्याने मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी तिने आत्महत्येचा प्रयत्न करत कीटकनाशक प्राशन केले. त्यानंतर नातेवाइकांनी तिला उपचारासाठी महबूबाबाद एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आज सकाळपर्यंत मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
13 yr old sadhvi in mahakumbh
महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…

हेही वाचा >> Sudha Murthy : “बहीण आपल्या भावासाठी कितीही…”, रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुधा मूर्तींनी सांगितली कहाणी!

उपचार सुरू असले तरी आपला मृत्यू अटळ आहे हे या अल्पवयीन मुलीला कळून चुकलं होतं. त्यामुळे तिने आपल्या भावांना शेवटची राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. तिला राखी बांधण्यासाठी काल रात्री तिच्या भावांना रुग्णालयात बोलावण्यात आले. तिने आपल्या भावांना प्रेमाने जवळ घेत कपाळावर चुंबन दिले. प्रेम, आपुलकीने तिने त्यांच्याविषय़ी काळजी व्यक्त केली. त्यानंतर तिने आपल्या भावांच्या हाताला राखी बांधली. राखी बांधताना हा क्षण कॅमेऱ्यातही कैद करण्यात आला.

आई-बाबांची काळजी घे, भावांकडून घेतलं वचन

राखी बांधल्यानंतर तिने आपल्या पालकांबाबत एक वचन घेतलं. पालकांची योग्यरित्या काळजी घेण्याचं वचन तिने भावांकडून घेतलं. या भावनिक क्षणानंतर काही वेळातच तिचे निधन झाले.तिच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नरसिमुलापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीवर कारवाई करण्यासह या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Story img Loader