Ayodhya Ram Mandir : देशभरातील नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन येत्या २२ जानेवारी रोजी केलं जाणार आहे. या दिवशी मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील अनेग दिग्गजांना, मोठ्या नेत्यांना, कलाकार, खेळाडू आणि साधू-संतांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. हजारोंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.

दरम्यान, १८ जानेवारी रोजी मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली. या मंदिरातला मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. ही मूर्ती मंदिरात आणताना एका वस्त्रात गुंडाळली होती. तसेच मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. आत ती पट्टी काढण्यात आली आहे. त्यामुळे श्रीरामाचं दर्शन झालं आहे. मंदिरात रामलल्ला म्हणजेच बाळ रुपातील रामाची मूर्ती असणार आहे. तसेच शिल्पकार अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेली रामाची मूर्तीही असणार आहे. अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा होतेय.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे

रामाची ही मूर्ती खूप आकर्षक आहे. मधुर हास्य, कपाळावर टिळा, हातात सोन्याचा धनुष्यबाण असलेल्या रामाचं लोभस रूप या मूर्तीत पाहायला मिळालं आहे. मूर्तीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेल्या सर्व कामगारांनी गाभाऱ्यात मूर्ती ठेवल्यानंतर हात जोडून प्रार्थनादेखील केली. तसेच रामनामाचा जप केला.

अरूण योगीराज यांनी साकारली श्रीरामाची मूर्ती

कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण योगीराज यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्पं साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना मैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं.

कशी आहे श्रीरामाची मूर्ती?

  • गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे.
  • ५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पार पडणार आहे.
  • शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंच उच आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे.
  • गाभाऱ्यात ही मूर्ती ठेवली जाणार आहे आणि २२ जानेवारी या दिवशी दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल जो दुपारी १ वाजपेर्यंत चालेल.