नितीन गडकरींच्या हाताखाली काम करण्याचे नाकारात चोवीस तासापूर्वीच राम जेठमलानी यांचा मुलगा अॅड. महेश जेठमलानी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच, भाजपचे जेष्ठ नेते राम जेठमलानी यांनी नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नितीन गडकरी यांनी ताबडतोब भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असं जेठमलानी यांनी म्हटले आहे. जसवंत सिंग, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा ह्या मंडळींचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही जेठमलानी यांनी स्पष्ट केले आहे. गडकरींना अपराधी ठरवून राजीनामा मागण्यापेक्षा, जर त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला तर आम्हाला आनंद होईल, असंही जेठमलानी पुढे म्हणाले.
आधीच भ्रष्टाचाराचे आरोप आणि रविवारी भोपाळमध्ये एका समारंभात गडकरींनी स्वामी विवेकानंद-दाऊद यांची तुलना केल्याने राजकीय वर्तुळात भडका उडाला आहे.
फक्त मीच नव्हे तर, पक्षातील अनेक जेष्ठ नते गडकरींवर नाराज आहेत. त्यामुळे, माझ्या वक्तव्यानंतर मला पक्षातून काढण्य़ाचं धाडस दाखवावंच, असं आव्हानही जेठमलानी यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2012 रोजी प्रकाशित
गडकरी यांनी राजीनामा द्यावा-राम जेठमलानी
नितीन गडकरी यांनी ताबडतोब भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असं जेठमलानी यांनी म्हटले आहे. जसवंत सिंग, यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा ह्या मंडळींचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही जेठमलानी यांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-11-2012 at 08:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram jethmalani demands nitin gadkaris resignation