कर्नाटकच्या म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची निर्मिती केली. आज राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत उपस्थित असताना ते भावूक झालेले पाहायला मिळाले. “मी आज जगातला सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे”, अशी प्रतिक्रिया अरुण योगीराज यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी आज पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे, असे समजतो. माझ्या पुर्वजांचे आशीर्वाद, कुटुंबाचे सहकार्य आणि प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद माझ्यासमवेत असल्यामुळेच मी हे कार्य करू शकलो. कधी कधी तर मला वाटते की, मी स्वप्नाच्या जगात आहे”, अशी प्रतिक्रिया अरुण योगीराज यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; गोविंदगिरी महाराज म्हणाले, “श्रीमंत योगी…”

राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची म्हणजेच बालवयातील रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थिती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंदिराच्या आवारात अनेक धर्मांचे प्रतिनिधी, विविध समाज घटकांचे नेते उपस्थित होते. मंदिराचे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली मंदिरातील पूजाविधी पार पडल्या.

Arun Yogiraj: दगडाला देवपण देणारे हात! अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्ती पाहून तुम्हीही हेच म्हणाल

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये काय?

रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागात स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्याची आकृती कोरण्यात आली आहे. मूर्तीच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे.

याशिवाय रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि यांच्या आकृत्या कोरण्यात आल्या आहेत.

कमळ, हनुमान आणि गरुडही या मूर्तीवर आहेत.

रामाच्या या मूर्तीचं वजन २०० किलो आहे. तर उंची ५१ इंची आहे.

Ayodhya Ram Mandir : चारही बाजूंना तटबंदी, गणपती बाप्पाचेही होणार दर्शन; तीन मजली राम मंदिराचं वैशिष्ट्य काय? समितीने दिली माहिती

कोण आहेत अरुण योगीराज?

अरूण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत. त्यांचं घराणंच मूर्तीकारांचं आहे. कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होतं. अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून त्यांची गणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. अरुण यांना मूर्ती साकारण्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला आहे.