Arun Yogiraj On Ram Lalla Murti: अयोध्येतील बहुचर्चित प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी म्हैसूर स्थित शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामलल्ला यांची मूर्ती साकारली होती. २२ जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी अरुण योगीराज सुद्धा उपस्थित होते. पूजा व प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर योगीराज यांनी सांगितले की, अयोध्येतील अलंकरण (अलंकार) सोहळ्यानंतर राम लल्ला पूर्णपणे वेगळे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगीराज यांनी आज तक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “लल्ला पूर्णपणे वेगळा दिसत होता. मला वाटले की हे माझे काम नाही. अलंकरण (अलंकार) समारंभानंतर भगवान रामाचे रूप पूर्णपणे बदलले आहे, ज्यावेळी मूर्ती निर्माण झाली त्यावेळेस रूप वेगळे होते, आणि आता मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन झाल्यावर राम लल्लाचे रूप वेगळे होते. मला वाटतं की हे माझं काम नाही. दोन्ही रूपं खूप वेगळी दिसतात. देवाने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अयोध्येत ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रमाचे नेतृत्व केल्यानंतर बालरूपातील प्रभू रामाचा प्रसन्न चेहरा चर्चेत आला आहे. योगीराज म्हणाले की, “माझ्या लल्लाने मला आदेश दिला, मी त्याचे पालन केले.” योगीराज यांनी गेल्या सात महिन्यांचे वर्णन करताना या प्रवासाला अत्यंत आव्हानात्मक म्हटले आहे. मूर्ती कशी पूर्ण करायची याचा विचार नेहमी डोक्यात होता असं सांगताना ते म्हणाले, “मूर्तीतून शिल्पशास्त्राचे पालन करताना प्रभू रामाच्या चेहऱ्यावर पाच वर्षांच्या मुलाचा निष्पापपणा दाखवावा या दोन्ही गोष्टींचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असायचा.”

योगीराज यांनी नमूद केले की ते त्यांच्या मित्रांना विचारायचे की राम लल्लाचे डोळे ठीक आहेत का. “दगडात भाव (भावना) आणणे सोपे नाही आणि त्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. म्हणून मी ठरवले होते की मी शिळेचा आधी अभ्यास करेन, माझा गृहपाठ करेन, लहान मुलांच्या चेहऱ्याचा व वैशिष्ट्यांचा अभ्यास करेन. मी अभ्यास केला पण बाकी सर्व काही राम लल्लामुळे घडले.”

चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांचे प्रमाण (डोळे, नाक, हनुवटी, ओठ, गाल, इ.) शिल्प शास्त्राचे पालन करण्यात आले होते असेही योगीराज यांनी विशेषतः नमूद केले. दुसरीकडे, मंदिर ट्रस्टने अरुण योगीराज यांना मूर्ती पूर्ण करण्यासाठी कोणते निकष प्रदान केले होते याविषयीही त्यांनी माहिती दिली. हसरा चेहरा, दिव्य रूप, ५ वर्षीय स्वरूप , राजपुत्राचे स्वरूप हे चार मुख्य निकष मंदिराकडून सांगण्यात आले होते.

हे ही वाचा<< रामलल्लाच्या माथ्यावरील ११ कोटी रुपयांच्या मुकुटात दडलेले ‘हे’ बारीक पैलू पाहा, कसा व कोणी घडवला राजमुकुट?

राम लल्लाच्या मंत्रमुग्ध हास्याबाबत सांगताना योगीराज यांनी म्हटले की, दगडावर काम करताना एकमेव संधी मिळत असते त्यामुळे बारकाईने काम करावे लागते. निरागस हास्य साकारण्यासाठी “मला मुलांसह खूप वेळ घालवावा लागला, आणि मी बाहेरच्या जगापासून दूर झालो. मी स्वतःला सुद्धा शिस्त लावली आणि दगडावरही बराच वेळ घालवला.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram lalla murti has changed ayodhya ram mandir arun yogiraj reaction says this is not my work how krishna sheela was carved svs
Show comments