पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे उद्घाटन केलं. तसंच, १५ हजार ७०० कोटींहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधितही केले. “एक काळ असा होता की रामलल्ला झोपडीत राहत होते, आता फक्त रामलल्लाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरुपी घर मिळाले आहे”, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज देशात केवळ केदारधामचे पुनरुज्जीवन झाले नाहीतर ३१५ हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालयेही बांधली गेली आहेत. आज देशात केवळ महाकाल महालोकाचीच निर्मिती झाली नाही, तर प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी २ लाखांहून अधिक पाण्याच्या टाक्याही बांधल्या.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन
Process of house sale by developer without lot Mumbai news
सोडतीविनाच विकासकाकडून घरविक्रीची प्रक्रिया?

हेही वाचा >> “कदाचित फडणवीसांच्या वजनानेच बाबरी…”, उद्धव ठाकरेंची खोचक टीका; म्हणाले, “मी त्यांना धन्यवाद देतो की…”

अयोध्येच्या विमानतळाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अयोध्या धाम विमानतळाचे नामकरण त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने केल्याने या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आशीर्वाद मिळेल. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले रामायण हे ज्ञानाचा मार्ग आहे, जो आपल्याला भगवान श्री रामाशी जोडतो. आधुनिक भारतात, महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम, आपल्याला दिव्य-भव्य-नवीन राम मंदिराशी जोडेल.”

मी भारतातील प्रत्येकाचा पूजक

“आज संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्येतील जनतेमध्ये कमालीचा उत्साह आहे. मी भारताच्या प्रत्येकाचा पूजक आहे. मीही तुमच्यासारखाच उत्सूक आहे. आम्हा सर्वांच हा जल्लोष आणि उत्साह अयोध्येच्या रस्त्यावर पूर्णपणे दिसत होता. जणू संपूर्ण अयोध्या नगरी रस्त्यावर आली आहे. या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >> PM Modi Interview: बेरोजगारी, महागाईच्या समस्येचं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

आजचा दिन ऐतिहासिक

“देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख खूप ऐतिहासिक आहे. या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. आज स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत अशा एका शुभदिनी आपण स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला आज अयोध्या नगरीतून नवी ऊर्जा मिळत आहे. याठिकाणी १५ हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली असून विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे’, असंही मोदी म्हणाले.