Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता असून आज मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्येमध्ये तयारी चालू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींसोबतच कला क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात येत आहे.

Live Updates

Ayodhya Ram Mandir Inauguration Today, 22 January 2024: अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा

18:21 (IST) 22 Jan 2024
जनकपूरमध्ये दिवाळी

नेपाळमधील जनकपूर (सीतेचं माहेर) येथे दीपमहोत्सव साजरार केला जात आहे.

18:19 (IST) 22 Jan 2024
शरयू घाटावर दीपमहोत्सव

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर शरयू घाटावर भाविकांनी दिवे लावले आहेत. या दिव्यांच्या उजेडात शरयू तीर उजळून निघाला आहे.

18:02 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir: पंतप्रधानांचं देशवासीयांना दीप लावण्याचं आवाहन

पंतप्रधानांचं देशवासीयांना दीप लावण्याचं आवाहन

17:30 (IST) 22 Jan 2024
“कोण पहात असेल, नसेल…बाळासाहेब, दिघेसाहेब हा सोहळा पहात आहेत”… मुख्यमंत्र्यांचे उद्गार

आजही हा ऐतिहासिक सोहळा कोण पहात असेल नसेल पण बाळासाहेब आणि आनंद दिघे जरुर हा सोहळा पहात असतील, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे येथे काढले.

वाचा सविस्तर…

17:18 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दाखल

एकीकडे अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

16:42 (IST) 22 Jan 2024
पिंपरी-चिंचवड : ‘जय सियाराम’चा नारा, मंगलमय वातावरण अन्‌ लाखो रामभक्तांची रथयात्रा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा…

16:35 (IST) 22 Jan 2024
कोल्हापुरात अंबाबाईची श्रीराम पंचायतन रुपात पूजा

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीची आज अलंकारिक पूजा श्रीराम पंचायतन रुपात बांधण्यात आली. अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त ही पूजा साकारण्यात आली. आजची पूजा श्रीपूजक शरद मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, केतन गोकाक, लाभेश मुनीश्वर , रवी माईणकर यांनी बांधली.

16:07 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची प्रतिक्रिया

जातीचं विष आता निष्प्रभ होणार आहे. कारण राम शबरीचेही आहेत, राम वाल्मिकींचेही आहेत, राम सगळ्यांचे आहेत – बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री

15:59 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये सोहळ्यासाठी हजर राहिलेले अभिनेते अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन यांना अभिवादन केलं

15:58 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: आदित्य ठाकरेंची सोशल पोस्ट

आदित्य ठाकरेंनी प्राणप्रतिष्ठेनंतर बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगत केली एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे.

15:40 (IST) 22 Jan 2024
दिवंगत आनंद दिघे यांच्या आश्रमातील लॉकर सीबीआयच्या पथकाने उघडले आणि…

ठाणे : बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर काही दिवसांनी सीबीआयचे एक पथक दिवंगत आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात आले. त्या पथकाने आनंद आश्रमाची झाडाझडती सुरू केली.

वाचा सविस्तर…

15:04 (IST) 22 Jan 2024
पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण

चिंचवडगाव, केशवनगर येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडांगण येथे हा उपक्रम पार पडला.

सविस्तर वाचा…

14:54 (IST) 22 Jan 2024
उरण शहरात श्रीरामाच्या जल्लोषात भव्य शोभायात्रा

अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने उरणच्या राम मंदीर चौकातून सोमवारी उरण मधील नागरिकांनी पुष्प वर्षाव, भव्य रांगोळ्या, डीजे, ढोल, ताशे, लेझीम, ब्रास बँड आणि भजनांचा निनादात शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

वाचा सविस्तर…

14:54 (IST) 22 Jan 2024
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रज्वलित केली १११ फूट अगरबत्ती

ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठपनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १११ फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली. यावेळी ढोल ताशे वाजवत रामाचा जयघोष करण्यात आला. अनेक जण ढोल ताशांच्या गजरावर थिरकत होते.

वाचा सविस्तर…

14:34 (IST) 22 Jan 2024
पनवेलमध्ये राममय वातावरण

पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने विविध मंदिरांमध्ये तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी पनवेल शहरातील विविध मंदिरांमध्ये श्री रामांची आरती, रामनामाचा जप, विविध यज्ञ असे धार्मिकविधी करण्यात आले आहेत.

वाचा सविस्तर…

14:33 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration:

काही लोक म्हणत होते की राम मंदिर तयार झालं तर भारतात आग लागेल. असे लोक भारताचा सामाजिक भाव समजू शकले नाहीत. राम मंदिराची उभारणी कुठली आग नाही, तर एक ऊर्जा निर्माण करत आहे – नरेंद्र मोदी</p>

14:28 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर राम मंदिर सोहळ्याचा उत्साह

न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर राम मंदिर सोहळ्याचा उत्साह

14:27 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration:

रामलल्ला आता झोपडीत राहणार नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>

14:22 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: मी आज प्रभू श्रीराम यांची माफी मागतो – नरेंद्र मोदी

मी आज प्रभू श्रीरामची माफी मागतो. आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षांपर्यंत हे काम करू शकलो नाही. आज ती कमतरता भरून निघाली. मला खात्री आहे की प्रभू राम आज आपल्याला नक्कीच क्षमा करतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

14:20 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अयोध्येत भाषण

आपले राम आज आले आहेत. आता आपले राम झोपडीत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहणार आहेत. २२ जानेवारी हा दिवस कित्येक पिढ्यांच्या लक्षात राहण्याजोगा झाला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

14:11 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration:

रामलल्लाची मूर्ती तयार करणारे मूर्तीकार अरुण योगराज यांची पहिली प्रतिक्रिया

14:10 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: बॉलिवुडमधील कलाकारांची सोहळ्याला उपस्थिती

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली

14:08 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration:

आपल्याला सर्व कलहांना तिलांजली द्यावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याची सवय आपल्याला सोडून द्यावी लागेल. रामराज्यातले सामान्य नागरिक प्रमाणिक होते. फक्त गप्पा करणारे नव्हते. अहंकारी नव्हते. धर्माचरण करत होते – मोहन भागवत

14:06 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration:

पंतप्रधानांनी तप केलं, आता आपल्यालाही तप करायचं आहे – मोहन भागवत

14:05 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण

या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगतल्यापेक्षाही कठोर व्रत ठेवलं. ते तपस्वी आहेतच. पण ते एकटेच व्रत करत आहेत. आपण काय करतोय? – सरसंघचालक मोहन भागवत

13:54 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: मंदिर तिथेच बनवलं जिथे बनवायचं होतं – योगी आदित्यनाथ

मंदिर तिथेच बनवलं जिथे बनवायचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी त्यासाठी आभार मानतो. आत्ता गाभाऱ्यात वैदिक पद्धतीने रामलल्लांच्या बालरुपाची प्राणप्रतिष्ठा पार पडली – योगी आदित्यनाथ</p>

13:53 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: आदित्य ठाकरेंचं ट्वीट

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्वीट, म्हणाले, “रघुपती राघव राजा राम, पतित पावन सिता राम! हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं! प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो!”

13:52 (IST) 22 Jan 2024
Ayodhya Ram Mandir Inauguration: भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीयेत – योगी आदित्यनाथ

आज भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीयेत. मन भावुक झालं आहे. तुम्हाला सगळ्यांनाही हेच वाटत असेल. या ऐतिहासिक क्षणी भारतातलं प्रत्येक ठिकाण अयोध्याधाम आहे. प्रत्येक मार्ग राम जन्मभूमीच्या दिशेने येत आहे – योगी आदित्यनाथ</p>

13:47 (IST) 22 Jan 2024
वर्धेच्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात सुंदरकांड, दीपोत्सव, परिसंवाद आणि बरेच काही…

वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आज रामलल्ला अभिषेक सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमास प्रारंभ होत आहे.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 22 Jan 2024
नागपुरात घरोघरी भगवे ध्वज, रांगोळ्या, तोरण अन् मिरवणुकांमध्ये ‘जय श्री राम’चा गजर

नागपूर : अयोध्येत प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठानपना होणार असल्याने सोमवारी नागपूरकरही रामाच्या भक्तीत लिन झाले. शहरातील विविध भागांत मंदिर, रस्ते, चौक, अपार्टमेंट, निवासस्थानांवर भगवे ध्वज, तोरण, झेंडे, रस्त्यांवर रांगोळ्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. सर्वत्र मिरवणुकांमध्ये जय श्रीरामाचा गजर एकू येत होता.

सविस्तर वाचा…

रामसोहळय़ाची सिद्धता, प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सजली; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

Ayodhya Ram Mandir Inauguration Today, 22 January 2024: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी निगडित सर्व महत्त्वाच्या घडामोडी