Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता असून आज मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्येमध्ये तयारी चालू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींसोबतच कला क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात येत आहे.

Live Updates

Ayodhya Ram Mandir Inauguration Today, 22 January 2024: अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा

11:34 (IST) 22 Jan 2024
“प्रत्येक भारतीयाची भावना…”, राम मंदिराबाबत प्राजक्ता माळीची पोस्ट

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राम मंदिरासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा

11:33 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya : सचिन तेंडुलकर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल

VIDEO : सचिन तेंडुलकर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल
11:32 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अयोध्येत नामवंत गायकांच्या गायनानं भक्तीमय वातावरण!

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये विविध प्रसिद्ध गायकांची भक्तीभावपूर्ण गाणी सादर होत आहेत. यामध्ये सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन अशा अनेक मान्यवर गायकांचा समावेश आहे.

11:21 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: “…म्हणून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालता येणार नाही”

फक्त इतर समुदायाचे लोक एखाद्या परिसरात राहतात म्हणून तिथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यावर निर्बंध घालता येणार नाहीत – सर्वोच्च न्यायालयाचे तामिळनाडू सरकारला आदेश

10:43 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींव टीकास्र!

मला मंदिरात जाऊ दिलं जात नाहीये, मी मंदिरात जाऊ नये अशी त्यांची इच्छा नाही. हे तर स्पष्ट आहे की हे आदेश त्यांना ‘वरून’ आले असणार – राहुल गांधी</p>

10:08 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: मोदींनी आयुष्यात कधीच प्रभू श्रीरामाच्या तत्त्वांचं पालन केलेलं नाही – भाजपा नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी होणार आहे. पण पूजेदरम्यान पंतप्रधान म्हणून त्यांचं महत्त्व शून्य असेल. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रभू श्रीराम यांच्या तत्वांचं पालन केलेलं नाही. विशेषत: त्यांच्या पत्नीविषयीची त्यांची वागणूक पाहाता हे दिसत आहे. शिवाय गेल्या १० वर्षांत पंतप्रधान म्हणून ते रामराज्याप्रमाणे वागलेले नाहीत – सुब्रह्मण्यम स्वामी

09:44 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अवकाशातून राम मंदिराचं पहिलं दर्शन!

अवकाशातून राम मंदिराचं पहिलं दर्शन! केंद्र सरकारने शेअर केले फोटो!

09:19 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: आज अटलजी असते, तर त्यांनी हेच म्हटलं असतं – भाजपाचं ट्वीट!

आज अटलजी असते, तर त्यांनी हेच म्हटलं असतं – नरेंद्र मोदी</p>

09:12 (IST) 22 Jan 2024
“अयोध्येत नवे ‘मोदी रामायण’ निर्माण झालं, याचा श्रीरामाच्या सत्य, चारित्र्य अन्…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल

आधुनिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्यानिमित्ताने पूजाअर्चा, व्रत, अनुष्ठाने करीत आहेत, उपवास करीत आहेत. पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, ते गंमतीचे आहे. अयोध्येत यानिमित्ताने नवे ‘मोदी रामायण’ निर्माण झाले, ते संपूर्ण राजकीय आहे. श्रीरामाच्या जीवन, चारित्र्याशी, रामराज्याशी, सत्य मार्गाशी, संयम आणि शौर्याशी या ‘मोदी-रामायणा’चा संबंध नाही. त्यांचे रामायण त्यांच्यापाशी, असा टोला शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

वाचा सविस्तर…

09:10 (IST) 22 Jan 2024
लालकृष्ण अडवाणी प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, कारण…

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमत्त देशभरात उत्सहाचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्ण देश राममय झाला आहे. अयोध्याही प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त सजली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नेते, कलाकार, खेळाडू अयोध्या नगरीत दाखल झाले आहे. अशातच भाजपाचे ज्येष्ठ नेते, लालकृष्ण आडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत.

वाचा सविस्तर…

09:10 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: राष्ट्रपतींच्या शुभेच्छांवर पंतप्रधानांची प्रतिक्रिया

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना धन्यवाद दिले.

09:07 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: मीरा रोड परिसरात दोन गटांमध्ये तणाव

मुंबईजवळील मीरारोड परिसरात राम मंदिर सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंं. नया नगर परिसरातील पोलीस स्थानकाला तातडीने यासंदर्भात माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित गटांमधील एकूण ५ व्यक्तींना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09:05 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अयोध्येत डोळ्यांचं पारणं फेडणारा ड्रोन शो!

अयोध्ये रविवारी रात्री ड्रोन शो!

09:04 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: विकी कौशल व कतरिना कैफ अयोध्येला रवाना

अभिनेता विकी कौशल कतरिना कैफ मुंबई विमानतळावरून अयोध्येला रवाना होताना…

08:41 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणतात, “मी मोदीविरोधी नाही”

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे हिंदूंचा स्वाभिमान जागृत झाला आहे. ही छोटी बाब नाही. खरी गोष्ट ही आहे की आम्ही मोदींविरोधी नसून मोदींचे समर्थक आहोत. कारण हिंदूंच्या बाजूने इतक्या सक्षमपणे कोणते पंतप्रधान स्वतंत्र भारतात उभे राहिले होते? अनेक चांगले पंतप्रधान झाले, पण हिंदूंच्या बाजूने उभा राहिलेला पंतप्रधान कोण होता? – शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

08:38 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अँटिलियावर विद्युत रोषणाई!

उद्योगपती मुकेश अंबानी यांचं मुंबईतील घर अँटिलियावर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

08:36 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा, काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंची महाआरती!

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा, उद्धव ठाकरेंची नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती! व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटानं म्हटलं ”

काळाराम मंदिरातील महाआरती ही देशात पुन्हा ‘रामराज्य’ आणण्यासाठी आहे!”

08:32 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अमेरिकेत कार रॅली!

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिजवर कार रॅली काढण्यात आली.

08:15 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: जो जय श्रीराम म्हणणार नाही, त्याचा लवकरत रामनाम होणार – बाबा रामदेव

जे जय श्रीराम म्हणणार नाहीत, त्यांचा लवकरच रामनाम होणार आहे. जीवनातले असे कोणतेही आदर्श नाहीत, जे प्रभू श्रीरामांकडून शिकता येणार नाहीत. ही प्राणप्रतिष्ठा म्हणजे येणाऱ्या रामराज्याची नांदी आहे – बाबा रामदेव

08:02 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: राम मंदिर सोहळ्याआधी पंतप्रधानांचं अरिचल मुनाई समुद्र किनाऱ्यावर अर्घ्यदान!

रामसेतूचा प्रारंभ होणाऱ्या अरिचल मुनाई समुद्रकिनाऱ्याला पंतप्रधानांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भेट दिली.

08:00 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांचं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्वीट, शेअर केला ‘त्या’ मजुरांचा व्हिडीओ!

07:57 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: श्री श्री रवीशंकर अयोध्येत दाखल

श्री श्री रवीशंकर अयोध्येत दाखल

07:56 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: पाच वर्षांच्या बालरुपात रामराया अयोध्येच्या मंदिरात होणार विराजमान, ‘ही’ आहेत मूर्तीची वैशिष्ट्ये

गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे.

५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ तारखेला पार पडणार आहे.

शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे.

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे.

या मूर्तीची निर्मिती शाळीग्राम या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन शाळीग्राम दगडापासूनच तयार केल्या जातात.

रामलल्लाची पाच वर्षांचं रुप दाखवणारी ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे.

वाचा सविस्तर

07:54 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: शरद पवार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार का? आमंत्रण मिळाल्यानंतर स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “राम मंदिराचं बांधकाम पूर्ण…”

शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. तसंच, राज्यसभेतील खासदार आहेत. त्यामुळे त्यांना आमंत्रण प्राप्त झालं आहे. हे आमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी पत्राची पोचपावती म्हणून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला आभारपर पत्र लिहिले आहे.

वाचा सविस्तर

07:53 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अमेरिका रामाच्या भक्तीत तल्लीन! टेस्ला कारच्या लाइट्सने उजळले श्रीरामाचे नाव, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील राम भक्त टेस्ला कारच्या लाइट्सच्या मदतीने श्रीरामाला आदरांजली वाहताना दिसत आहे.

वाचा सविस्तर

07:52 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: अयोध्येला न जाता कसा पाहू शकता श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा? घरबसल्या कसे घेऊ शकता प्रभु रामाचे दर्शन?

Ram Mandir Pran Pratishtha Live Telecast: श्री राम मंदिर प्राण प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा प्रत्येक सेकंद तुम्ही घरी बसून कसा पाहू शकता

वाचा सविस्तर!

07:43 (IST) 22 Jan 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदू समाजाचा स्वाभिमान जागा झाला-शंकराचार्य

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यापासून हिंदू समाजाचा स्वाभिमान जागा झाला आहे. आम्ही त्यांच्यावर टीका केलेली नाही. राम मंदिर उभारणीसाठी आम्ही त्यांचं कौतुकच करतो आहोत. तसंच आम्ही मोदी विरोधी नाही हे समजून घ्या.

सविस्तर वृत्त

07:39 (IST) 22 Jan 2024
Ram Temple Inauguration: राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून दुपारी ११ ते २ या कालावधीमध्ये प्राणप्रतिष्ठेचे मुख्य विधी पार पडतील.

07:38 (IST) 22 Jan 2024
Ram Temple Inauguration: कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम?

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० च्या सुमारास अयोध्येत दाखल होतील. दुपारी ११ ते १ च्या दरम्यान अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य विधी केले जाणार आहेत. दुपारी १ च्या सुमारास मोदी राम मंदिर सोहळ्यात सहभागी होतील.

07:32 (IST) 22 Jan 2024
Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सजली!

राम मंदिर ट्रस्टनं शेअर केला अयोध्येतील रात्रीच्या तयारीचा व्हिडीओ!

रामसोहळय़ाची सिद्धता, प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सजली; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

Ayodhya Ram Mandir Inauguration Today, 22 January 2024: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी निगडित सर्व महत्त्वाच्या घडामोडी