एनसीईआरटीच्या इयत्ता बारावीच्या राजशास्त्राच्या पुस्तकातून अयोध्या वाद आणि बाबरी मशिदीबाबतचे काही ऐतिहासिक संदर्भ वगळण्यात आले आहेत. त्यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात आता राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास महाराज यांनीही प्रतिक्रिया दिली असून एनसीईआरटीच्या पुस्तकातील अभ्यासक्रमाबाबत आपण असमाधानी असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करत आहेत, काँग्रेस मात्र…”; राम मंदिराचे मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांची बोचरी टीका

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास महाराज यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीवर नाराजी व्यक्त केली आहे. ही माहिती अपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच या पाठ्यपुस्तकांमध्ये ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख नसून त्यांनी थेट ९ डिसेंबर २०१९ रोजी बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल लागल्यानंतरची माहिती दिली आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे आपण असमाधानी आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

एनसीईआरटीच्या संचालकांनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, काल एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनीही यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. आपण विद्यार्थ्यांना दंगलीबाबतचे शिक्षण का द्यायचे? हिंसा वाढवणे आणि वैफल्यग्रस्त नागरिक निर्माण करणे, हा पाठ्यपुस्तकांचा उद्देश असू शकत नाही. शाळांमध्ये इतिहासाच्या माध्यमातून तथ्ये शिकवली जातात. त्याला रणांगण बनविता कामा नये. द्वेष आणि हिंसाचार हे शाळेत शिकविण्याचे विषय नाहीत, असं त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

हेही वाचा – “व्होट बँकेचं राजकारण हे अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाशी संबंधित”, NCERT च्या पाठ्यपुस्तकातील धड्यामुळे नवा वाद?

नेमकं प्रकरण काय?

एनसीईआरटीने १२ वीच्या राज्यशास्त्रातील पुस्तकातील अभ्यासक्रमात काही बदल केले असून ऐतिहासिक घटनांचा अनुल्लेख केला आहे. अयोध्या वादावरचा इतिहास चार पानांवरून दोन पानांवर आणला गेला आहे. तर बाबरी मशिदीचा उल्लेख टाळून त्याजागी ‘तीन घुमट असलेला ढाचा’ असा उल्लेख केला गेला आहे. तसेच अयोध्या प्रकरणात भाजपाची सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशिदीचे पतन झाल्यानंतर उसळलेली हिंसा, भाजपाशासित राज्यात राष्ट्रपती राजवट आणि अयोध्येतील हिंसाचारानंतर भाजपाने व्यक्त केलेला खेद या घटनांचा उल्लेख या धड्यात करण्यात आला आहे.

Story img Loader