अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात सोमवारी (२२ जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम जन्मभूमी ट्रस्टने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि केंद्रीय संरक्षण यंत्रणांनी या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त केला आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने शुक्रवारी रात्री या मंदिरावरून धमकी दिली आहे. जैशने म्हटलं आहे की, “निर्दोष मुसलमानांच्या हत्येनंतर या मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे.” जैशच्या या टिप्पणीनंतर अयोध्या हाय अलर्टवर आहे. दरम्यान, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणाांमधील सूत्रांनी सांगितलं की, संपूर्ण परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे. तरीदेखील या टिप्पणीनंतर सावधानता बाळगली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा