Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : भारताच्या इतिहासात आणखी एका नव्या अध्यायाला सुरूवात होत आहे. अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज ( २२ जानेवारी ) पार पडणार आहे. यासाठी अयोध्या नगरी आणि देशभरात उत्सहाचं वातावरण आहे. श्री राम मंदिराची निर्मिती राम भक्तांनी दिलेल्या दानातून झाली आहे. श्री राम मंदिरासाठी देश आणि जगभरातील करोडो भक्तांनी कोट्यावधींचं दान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री राम मंदिराच्या निर्मितीसाठी सगळ्यात मोठं दान सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्यानं दिलं आहे. या हिरे व्यापाऱ्यानं दान देण्याच्याबाबतीत मोठ्या-मोठ्या उद्योगपतींनाही मागे टाकलं आहे. सूरतमधील हिरे व्यापारी असलेल्या लाखी कुटुंबानं श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी १०१ किलो सोन्याचं दान दिलं आहे. याचा वापर श्री राम मंदिरातील दरवाज्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी होणार आहे.

हेही वाचा : राम कथा अनेक तरी राम नामाचे गारुड सारखेच; काय आहे कारबि रामायण?

दिलीप कुमार वी. लाखी सूरतमधील सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्यापैकी एक आहेत. लाखी कुटुंबानं श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्टला आतापर्यंतचे सर्वातं मोठं दान दिल्याचं सांगितलं जातंय. मंदिरातील दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू, स्तंभ यासह मंदिरातील तळमजल्यावर असलेल्या १४ दरवाज्यांसाठी १०१ किलो सोनं लाखी कुटुंबानं दान केलं आहे.

हेही वाचा : रामायण भारताबाहेर कसे लोकप्रिय झाले? आशियातील लाओसपासून आफ्रिकेतील मॉरिशसपर्यंत रामायण कथेचा आश्चर्यकारक प्रवास…

सद्यस्थितीला १० ग्रॅम सोन्याची किंमत ६४ ते ६५ हजाराच्या आसपास आहे. त्यानुसार एक किलो सोन्याची किंमत ६४ लाख ते ६५ लाख होते. तर, १०१ किलो सोन्याची किंमत ६६ कोटी रूपयांच्या घरात जाते.

दरम्यान, प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येसह देशभरात उत्सहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सोहळ्याला नेते, कलाकार, संत, महंत यासाह विविध क्षेत्रातील मंडळी अयोध्येत दाखल झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram mandir pran pratishtha donor surat lakhi 101 kg gold for ram temple ssa
Show comments