यूपीए सरकारने नियुक्त केलेल्या काही राज्यांच्या राज्यपालांना पदावरून दूर करून त्यांच्याऐवजी भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी वर्णी लावली. उत्तर मुंबईचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांची उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सोमवारी पाच राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या.  दिल्ली भाजपचे ज्येष्ठ नेते ओ. पी. कोहली यांची गुजरातचे राज्यपाल म्हणून तर बलराम टंडन यांनी छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नेते विजयकुमार मल्होत्रा यांचीही राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नितीशकुमार यांची टीका
गेल्या राजवटीत नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांना हटविण्याच्या भाजपच्या कृतीवर  नितीशकुमार यांनी टीका केली आहे.

Story img Loader