माजी पेट्रोलियम मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते राम नाईक यांना उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त केले जाणार आहे. त्यांची बी एल जोशी यांच्याजागी नियुक्ती केली जाणार आहे. पाच राज्यांच्या राज्यपालपदासाठी केंद्र सरकारने भाजपच्या पाच वरिष्ठ नेत्यांची नावे निश्चित केली असून ती पंतप्रधानांकडे मंजुरीसाठी पाठविली आहेत. केसरीनाथ त्रिपाठी यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी, राम नाईक यांना उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी तर व्ही. के. म्हलोत्रा यांना कर्नाटकच्या राज्यपालपदी नेमले जाण्याची शक्यता असल्याचे समजते. तसेच कल्याण सिंह यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविण्यात येण्याची चर्चा असतानाच, आता कैलास जोशी यांची महाराष्ट्र राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या महिन्यातच अनेक राज्यपालांना राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी एल जोशी, छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त, नागालँडचे राज्यपाल अश्विनीकुमार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल एम के नारायणन यांनी आपापली पद सोडली आहेत .

Story img Loader