पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमी सणाला गालबोट लागलं आहे. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाल्यानंतर काही समाजकंठकांनी वाहनं जाळली आहेत. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर येताच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमी सण शांततेत साजरा करण्याचं आणि मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. असं असूनही पश्चिम बंगालमधील हावडा येथे हिंसाचाराची घटना घडली आहे. रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत गोंधळ झाला आहे. यामध्ये काही समाजकंठकांनी जाळपोळ करत वाहनांना आग लावली आहे.

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला, पाहा व्हिडीओ

समाजकंठकांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे अनेक वाहनांना आग लावली…

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एएनआय’ने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “रामनवमीची मिरवणूक काढणाऱ्यांना माझी विनंती आहे की, ती मिरवणूक कृपया शांततेत काढा. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लीम भागातून मिरवणूक काढणं टाळा. रामनवमी शांततेने साजरी करा, हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करू नका. चिथावणी देऊ नका. काही भाजपा नेते म्हणत आहेत की, ते रामनवमीच्या मिरवणुकीत तलवारी आणि चाकू घेऊन फिरतील. पण हा फौजदारी गुन्हा आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram navami procession in west bengal howrah vehicles torched viral video rmm
Show comments