राम मंदिराच्या मुद्दय़ावर विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका काहीशी मवाळ केली आहे. सर्वोच्च न्यायालयालच्या निर्णयानंतरच कायमस्वरूपी राम मंदिर आकारास येईल असे विहिंपचे ज्येष्ठ नेते विनायकराव देशपांडे यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा विहिंपने सोडलेला नाही. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये रामोत्सव कार्यक्रमादरम्यान तो उपस्थित करू असे देशपांडे यांनी सांगितले. ‘लव्ह जिहाद‘चा मुद्दा भाजपने उपस्थित केला आहे. त्याचे विहिंपने स्वागत केले आहे. विहिंपने समुपदेशनाद्वारे दहा हजार मुलींना वाचवल्याचा दावाही त्यांनी केला. दिल्लीत २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जागतिक हिंदू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात महिला आणि युवकांच्या सबलीकरणावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.