२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या विजयाचे आणि समोरच्या पक्ष किंवा आघाडीच्या पराभवाचे दावे सगळेच करताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळात सध्या जागावाटप व आघाडी-युतीमध्ये समावेशाच्या चर्चा-बैठका होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर २०२४ नंतर नेमकं काय होणार? यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दावा केला आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेले रामदास आठवले यांनी यादरम्यान बोलताना आगामी राजकीय भवितव्याविषयी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याआधीच २०२४ च्या निवडणुकांमध्ये मोदींसह एनडीएमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचीही घोषणा केली आहे. २०२४ च्या निवडणुकांनंतर आपण मंत्री होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

येत्या १४ वा १५ मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा? आयोगाच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर निर्णयाची शक्यता

यावेळी रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा सरकार भारताचं संविधान बदलणार असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाला ‘संविधान सदन’ हे नाव दिलं आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे मोदी संविधान बदलणं शक्य नाही. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच”, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी मोदींना समर्थन दिलं आहे.

रामदास आठवलेंना मंत्रीपदाबाबत विश्वास

“नरेंद्र मोदी अनेकदा इथे आले. भारत सरकारच्या वतीने हजारो कोटींची मदत मुंबई-महाराष्ट्राला दिली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. मोदी पंतप्रधान झाले, की मी मंत्री होणार हे निश्चित आहे”, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या उमेदवार निश्चितीची प्रक्रियाही अद्याप पूर्ण झालेली नसताना रामदास आठवलेंनी त्यांच्या मंत्रीपदाबाबत विश्वास व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader