Ramdas Athawale In Delhi Assembly Election 2025 : निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात काल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) दिल्ली विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज आठवले यांच्या पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यामध्ये सुलतानपूर, मजरा कोंडली, तिमारपूर, पालम, नवी दिल्ली, पटपरगंज, लक्ष्मी नगर, नरेला, संगम विहार, सदर बाजार, मालवीय नगर, तुघलकाबाद, बदरपूर, चांदनी चौक आणि मतियारा महारल या मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने उमेदवार जाहीर केले आहेत.

delhi assembly election 2025
लालकिल्ला : भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Veteran singer Asha Bhosle statement on Narendra Modi and Yogi Adityanath
म्हणून मला मोदी अन् योगी आवडतात….ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वक्तव्य
Radhakrishna vikhe patil
अण्‍णा हजारे यांच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने प्रायश्चित्त करायला लावले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Mohan Singh Bisht
Mohan Singh Bisht: मुस्लिमबहुल मुस्तफाबादमधून विजयी होणारे भाजपा नेते मोहन सिंह बिश्त कोण आहेत?
Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले…
Omar Abdullah on Delhi Assembly Election
“और लडो आपस मै…”, ‘आप’ आणि काँग्रेस पराभवाच्या छायेत गेल्यानंतर ओमर अब्दुल्लांची खोचक पोस्ट
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!

जिंकल्यास भाजपाबरोबर जाणार

काल दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले होते की, “दिल्लीत आमची ताकद असूनही भाजपा आम्हाला एकही जागा देत नाही. असे असले तरी ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ३०-३५ मतदारसंघातील इच्छुकांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली आहे. जर दिल्लीत आमचे उमेदवार जिंकले तर आम्ही भाजपाला पाठिंबा देणार आहे.”

आप, भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस

दरम्यान दिल्लीमध्ये सुमारे गेल्या ११ वर्षांपासून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आम आदमी पार्टीने सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर, लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रीक करणारी भाजपा गेल्या २६ वर्षांपासून दिल्ली विधानसभेतून सत्तेबाहेर आहे. त्यामुळे त्यांनीही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे.

दुसरीकडे दिल्लीत अरविंद केजरीवाल सत्तेत येण्यापूर्वी सलग १५ वर्षे दिल्लीत सत्तेत राहिलेली काँग्रेसही विजयासाठी कामला लागली आहे. अशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचीही (आठवले) एन्ट्री झाल्याने दिल्लीची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत कोण बाजी मारणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये

पाच फेब्रुवारीला मतदान

दिल्लीमध्ये ७० विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने ७ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. यामध्ये ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळी दिल्लीत १.५ कोटी हून अधिक मतदार मतदान करणार आहेत. तर यापैकी २.०८ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. दरम्यान दिल्लीची ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Story img Loader