२०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी रमेश चेनिथल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, तेलंगणातील विजयानंतर माणिकराव ठाकरे यांच्यावरही गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याजागी अविनाश पांडे यांना प्रभारी बनवण्यात आलं आहे. सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी करण्यात आलं आहे. जयराम रमेश यांच्याकडे माध्यमविभाग आणि के.सी वेणुगोपाल यांच्यावर पुन्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजय माकन पक्षाचे खजिनदार तर मिलिंद देवरा आणि इंदर सिंघला हे सह खजिनदार असतील.
कुणाकडे कुठल्या राज्याची जबाबदारी?
- मुकूल वासनिक – गुजरात
- जितेंद्र सिंग – आसाम आणि मध्य प्रदेश
- रणदीप सिंग सुरजेवाला – कर्नाटक
- कुमारी सेजला – उत्तराखंड
- जी. ए. मीर – झारखंड आणि पश्चिम बंगाल
- दीपा दासमुंशी – केरळा, लक्षद्वीप आणि तेलंगणा
- डॉ. ए. चेल्लाकुमार – मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश
- अजोय कुमार – ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी
- भरतसिंह सोलंकी – जम्मू-काश्मीर
- राजीव शुक्ला – हिमाचल प्रदेश आणि चंदीगड
- सुखजिंदर सिंग रंधावा – राजस्थान
- देवेंद्र यादव – पंजाब
- गिरीश राय चोदनकर – त्रिपूरा, सिक्किम, नागालँड, मणिपूर
- मनिकम टागोर – आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार