Ayodhya Ram Mandir Inauguration First Darshan: अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता असून आज मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा पार पडल्यावर आता प्रभू श्रीरामांच्या प्रसन्न मूर्तीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सुद्धा उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्येत राम मंदिराच्या पूजेच्या अगोदर नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास पोस्ट करण्यात आली होती. “अयोध्या धाममध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण प्रत्येकालाच भावनिक करणारा आहे. या दिव्य कार्यक्रमाचा भाग होणं माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. जय सियाराम”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केली आहे.

Ram Mandir Ayodhya Inauguration Live: रामलल्ला विराजमान झाल्यावर नरेंद्र मोदींचा पहिला दंडवत!

अरुण योगीराज यांनी शाळीग्राम दगडापासून घडवलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्रसन्न मूर्तीची पहिली झलक यापूर्वी १८ जानेवारी रोजी समोर आली होती, तर आज आभूषणांनी, फुलांनी व तुळशीच्या पानांनी सजवलेली, पिवळी वस्त्रे धारण केलेली श्रीरामांची पहिली झलक पाहायला मिळत आहे.

रामाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये?

गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे.

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंच आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीची निर्मिती शाळीग्राम या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. 

हे ही वाचा << राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कामगारांचं बोलणं ऐकून महिंद्रा भारावले; म्हणतात, “२८ तास कामानंतर त्यांना बाजूला..”

दरम्यान, या कार्यक्रमानंतर मोदी ७,००० हून अधिक राम भक्तांच्या मेळाव्याला संबोधित करतील. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी अनेक मोठमोठ्या व्यावसायिकांना, कलाकारांना, खेळाडूंना व जगभरातील राम भक्तांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramlalla murti first look after ayodhya ram mandir pooja video of pm narendra modi historic moment watch here shreeram darshan online svs
Show comments