इंग्रजी दैनिक ‘द टाइम्स ऑफ इंडिया’चे पत्रकार जोसी जोसेफ आणि हिंदूी वृत्तवाहिनी ‘एनडीटीव्ही इंडिया’चे पत्रकार रवीश कुमार यांना प्रतिष्ठेच्या ‘रामनाथ गोएंका जर्नलिस्ट ऑफ द ईयर’च्या बहुमानाने, तर विविध क्षेत्रातील सवरेत्कृष्ट पत्रकारितेसाठी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील ३१ अव्वल पत्रकारांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पी. सथसिवम यांच्या हस्ते आज सायंकाळी २०१० सालच्या ‘रामनाथ गोएंका अवॉर्डस् फॉर एक्सलन्स इन जर्नलिझ्म’ने गौरविण्यात आले. वयोवृद्ध पत्रकार इंदर मल्होत्रा यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
रामनाथ गोएंका फौंडेशनच्या वतीने हॉटेल ताज पॅलेसमध्ये मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाच्या शानदार सोहळ्याला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कृषी मंत्री शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, विधी व न्याय मंत्री कपिल सिब्बल, केंद्रीय ऊर्जा मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, माहिती व नभोवाणी मंत्री मनीष तिवारी, अपारंपारिक ऊर्जा मंत्री फारुक अब्दुल्ला, हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा, माकपचे पॉलिटब्युरो सदस्य सीताराम येचुरी, सीबीआय संचालक रणजीत सिन्हा, लालकृष्ण अडवाणी यांच्या कन्या प्रतिभा, हिंदूुस्थान टाईम्सच्या अध्यक्ष व संपादकीय संचालक शोभना भारतीय, इंडिया टुडे समुहाचे मुख्य संपादक अरुण पुरी आणि ज्येष्ठ विधिज्ञ फाली एस. नरीमन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर न्या. सदासिवम आणि इंडियन एक्सप्रेसचे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
वर्षांतील सवरेत्कृष्ट पत्रकार जोसी जोसेफ आणि रवीशकुमार यांचा प्रत्येकी २.५ लाख रुपयांचा रोख पुरस्कार व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, तर अन्य विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा रोख पुरस्कार व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकारांसाठी असलेला स्व. संजीव सिन्हा पुरस्कार पृथा चटर्जी यांनी पटकाविला, तर प्रिया चंद्रशेखर पुरस्कार इंडियन एक्सप्रेस, दिल्लीच्या राकेश नटराज यांना देण्यात आला. इंडियन एक्सप्रेस, पुणे आवृत्तीचे दिवंगत निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागरी विषयांवरील पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार द हिंदूुस्थान टाईम्सच्या शिवानी सिंह यांनी पटकाविला. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सरन्यायाधीश सदासिवम आणि अन्य मान्यवरांसोबत छायाचित्र काढण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाचे संचालन सीएनएन-आयबीएनच्या सुहासिनी हैदर यांनी केले.
पुरस्कार विजेत्यांची नावे याप्रमाणे
प्रिंट माध्यम
वर्षांतील सवरेत्कृष्ट पत्रकार (प्रिंट माध्यम) : जोसी जोसेफ (द टाइम्स ऑफ इंडिया)
जम्मू आणि काश्मीर व ईशान्येकडील वृत्तांकन : मेहबूब जिलानी (द कॅराव्हान)
हिंदूी पत्रकारिता : अतुल चौरसिया (तहलका)
प्रादेशिक भाषा : प्रजेशसेन जी (माध्यमम डेली)
पर्यावरण पत्रकारिता : शालिनी सिंह (द हिंदूस्थान टाईम्स)
अनकव्हरींग इंडिया इनव्हिजिबल : सुप्रिया शर्मा (द टाइम्स ऑफ इंडिया)
व्यापार आणि अर्थविषयक पत्रकारिता : सौम्या भट्टाचार्या (बिझनेस टुडे)
राजकीय वृत्तांकन : वंदिता मिश्रा (द इंडियन एक्सप्रेस)
क्रीडा पत्रकारिता : शिवानी नाईक (द इंडियन एक्सप्रेस)
चित्रपट आणि टेलिव्हिजन पत्रकारिता : सुआंशु खुराणा (द इंडियन एक्सप्रेस)
ऑन द स्पॉट रिपोर्टिंग : मनु पब्बी(द इंडियन एक्सप्रेस)
शोध पत्रकारिता : चितलीन सेठी (ट्रिब्यून)
भारतात कार्यरत परदेशी पत्रकार : अॅमी काझमीन (फिनान्शियल टाइम्स)
समालोचन आणि विवेचनात्मक लेखन : विद्या सुब्रमण्यम (द हिंदू)
प्रकाश कर्दळे स्मृती नागरी पत्रकारिता पुरस्कार : शिवानी सिंह (द हिंदूस्थान टाइम्स)
पत्रकारितेशी संबंधित पुस्तक (गैरकादंबरी) : महमूद फारुकी (पेंग्वीन)
संजीव सिन्हा स्मृती पुरस्कार : पृथा चटर्जी (द इंडियन एक्सप्रेस)
प्रिया चंद्रशेखर स्मृती पुरस्कार : राकेश नटराज (द इंडियन एक्सप्रेस)
जीवनगौरव पुरस्कार : इंदर मल्होत्रा
इलेक्ट्रॉनिक माध्यम
वर्षांतील सवरेत्कृष्ट पत्रकार (इलेक्ट्रॉनिक माध्यम) : रवीशकुमार (एनडीटीव्ही इंडिया)
जम्मू आणि काश्मीर व ईशान्येकडील वृत्तांकन : मुफ्ती इस्लाह (सीएनएन-आयबीएन)
हिंदूी पत्रकारिता : उमाशंकर सिंह (एनडीटीव्ही इंडिया)
प्रादेशिक भाषा : कमलेश भोलानाथ देवरुखकर (आयबीएन लोकमत)
पर्यावरण पत्रकारिता : दिव्या श्रीनिवासन (न्यूज एक्स)
अनकव्हरींग इंडिया इनव्हिजिबल : रुपश्री नंदा (सीएनएन-आयबीएन)
व्यापार आणि अर्थविषयक पत्रकारिता : लता वेंकटेशन (सीएनबीसी टीव्ही-१८)
राजकीय वृत्तांकन : स्मिता शर्मा (आयबीएन-७)
क्रीडा पत्रकारिता : स्मृती अडवाणी आणि प्रियंका दुबे (सीएनएन-आयबीएन)
चित्रपट आणि टेलिव्हिजन पत्रकारिता : गीता दत्ता (न्यूज एक्स)
ऑन द स्पॉट रिपोर्टिंग : हृदयेश जोशी (एनडीटीव्ही इंडिया)
शोध पत्रकारिता : हरींदर बावेजा (हेडलाईन्स टुडे)