पश्चिम बंगालमधील सिलीगुडी भागात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तीला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. बुधवारी सकाळी सिलीगुडी येथील रहिवाशी वस्तीमध्ये पिसाळलेला हत्ती शिरला. त्यानंतर हा हत्ती शहरातील रस्त्यावर सैरावैरा पळत होता. त्यामुळे या परिसरातल्या शंभरहून अधिक घरांचे नुकसान झाले. याशिवाय, हत्तीने रस्त्यावर फिरणा-या अनेक दुचाकींना आपल्या पायाखाली चिरडले, वाहनांनाही धडक दिली. या हत्तीचा उच्छाद सुरु असताना नागरीक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. पिसाळलेल्या या हत्तीला आवर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांनाही हत्तीने जखमी केले. या हत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली होती. अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सिलिगुडीमध्ये जंगली हत्तीचा धुमाकूळ; घरांचे नुकसान
अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-02-2016 at 15:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rampaging elephant damages buildings in siliguri