Who is Ranjani Srinivasan: कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटची विद्यार्थिनी असलेल्या रंजनी श्रीनिवासनचा व्हिसा अमेरिकन प्रशासनाने रद्द केला. आता अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने जाहीर केले आहे की, रंजनीने सीबीपी होम (Customs and Border Protection) अॅपद्वारे स्वतः देश सोडण्याचा निर्णय घेतला. रंजनीवर हमासला पाठिंबा देण्याचा आरोप होता. सुरक्षेच्या कारणास्तव तिचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. रंजनीने स्वत:च अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
मला आनंद झाला…
५ मार्च रोजीच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने श्रीनिवासनचा व्हिसा रद्द केला होता. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “अमेरिकेत राहण्यासाठी व्हिसा असणे हा एक विशेषाधिकार आहे. पण, जर कोणी दहशतवाद आणि हिंसाचाराचे समर्थन करत असेल तर त्याच्याकडून हा विशेषाधिकार काढून घेतला पाहिजे आणि त्यांनी या देशात राहू नये. कोलंबिया विद्यापीठातील एका दहशतवादी समर्थकाने सीबीपी होम अॅपद्वारे स्वतःला हद्दपार केल्याचे ऐकून मला आनंद झाला.”
कोण आहे रंजनी श्रीनिवासन?
रंजनी कोलंबिया विद्यापीठात शहरी नियोजनात डॉक्टरेट करत होती. ती एफ-१ व्हिसावर अमेरिकेत शिक्षण घेत होती. त्याच वेळी, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीजने आरोप केला की, ती दहशतवादी संघटना हमासला पाठिंबा देत होती. रंजनीची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप चांगली आहे. तिने कोलंबिया विद्यापीठातून शहरी नियोजनात एम.फिल केले. याशिवाय, ती स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीधर आहे. तिने हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. यासह CEPT विद्यापीठातून बॅचलर ऑफ डिझाइन कोर्स देखील पूर्ण केला आहे.
एनवाययू वानगरच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, ती भारतातील शहरीकरणापूर्वीच्या शहरांचा अभ्यास करत होती. तिचा अभ्यास कामगारांच्या राजकीय अर्थव्यवस्थेवर केंद्रीत होता. याशिवाय, ती सध्याच्या रोजगाराच्या कमतरतेवरील अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती.
दुसऱ्या एका घटनेत महमूद खलील यांना अटक
एका दुसऱ्या वेगळ्या घटनेत, अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कायदेशीर स्थायी रहिवासी आणि कोलंबिया विद्यापीठाचे पदवीधर महमूद खलील यांना कॅम्पसमध्ये इस्रायलविरुद्ध निदर्शने आयोजित केल्याबद्दल अटक अटक केली. पॅलेस्टिनी वंशाचा खलील यांना पुढील कारवाई होईपर्यंत लुईझियाना इमिग्रेशन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.