स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी एक दावा केला आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उद्या पुण्यतिथी आहे. ३० जानेवारी १९४८ या दिवशी महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या. मात्र आता रणजीत सावरकर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ज्यामध्ये नथुराम गोडसेच्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झालीच नाही असं म्हटलं आहे. Make Sure Gandhi is Dead हे पुस्तक रणजीत सावरकर यांनी लिहिलं आहे.
पुस्तकात रणजीत सावरकर यांचा दावा काय?
मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन झालं आहे. या पुस्तकात रणजीत सावरकर यांनी हा दावा केला आहे की महात्मा गांधी यांच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या आणि नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. महात्मा गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नथुराम गोडसेच्या बंदुकीतून ज्या गोळ्या चालवण्यात आल्या त्याने महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. तसंच गांधींच्या हत्येमागे कोण आहेत हे शोधण्याचं आवाहनही रणजीत सावरकर यांनी केलं आहे. या पुस्तकामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
पुस्तकात काय दावा करण्यात आला आहे?
महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही. महात्मा गांधी यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. ज्या गोळीने महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलेली नव्हती असा मोठा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.
नथुरामला वाटलं की त्याने गोळ्या झाडल्या आणि गांधींचा मृत्यू झाला
नथुराम गोडसे फक्त Rss चे स्वयंसेवक होता. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेवर बंदी घालण्यात आली होती. हे राम चं नाव घेऊन मोठं पाप दाबून ठेवण्यात आलं होतं. ते या पुस्तकातून समोर येईल असाही दावा दिल्लीत रणजीत सावरकर यांनी केला. नथुरामांच्या गोळ्यांनी गांधीचा मृत्यू झाला नाही. कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. नथुराम गोडसेचा समज झाला की मीच गोळ्या मारल्या पण खऱ्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे २०० लोक होते. तिथे सुरक्षा व्यवस्था होती.
नथुराम गोडसे गुन्हेगार नव्हता. तो पत्रकार होते. त्यामुळे त्याचा निशाणा लागणे शक्य नव्हते. हे सगळे पुरावे पाहता गोडसेने महात्मा गांधींना मारले नाही. गांधीजी दुसऱ्यांच्या गोळ्यांनी मेले. ते कोण होते ते तपासायला हवे. यानंतर वल्लभभाई पटेल यांचा गट संपवण्यात आला. त्यानंतर आपण ग्रेट ब्रिटन सोबत व्यापार सुरू केला. १९७१ मध्ये हंटर विमान वापरले. पंडित नेहरूंना आणि ब्रिटनला याचा फायदा झाला. माझं आवाहन आहे, सरकारनं यावर एक आयोग नेमावा. गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले होते. त्यावर चौकशी सुरू करावी.